खानापूर / प्रतिनिधी
खानापूर शहर व तालुका तसेच जांबोटी भागात मंगळवार (दि. २४) मार्च रोजी सायंकाळी वळीव पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे येथील वीट व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील जांबोटी, गर्लगुंजी, निडगल, तोपिनकट्टी, इदलहोंड, अंकले, गणेबैल तसेच आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साठले आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या विटा पावसात सापडल्या असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. काही शेतकऱ्यांना पाऊसाचा अंदाज आला असल्याने शेतकऱ्यांनी विटा वरती प्लास्टिक कागद व ताडपत्री घातली होती. त्यामुळे त्यांचे नुकसान थोडे कमी झाले आहे. परंतु जमिनीवर राहिलेल्या विटा पाण्यात बुडल्याने त्या विरघळल्या आहेत.








