कित्तूर / वार्ताहर
कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केली. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही धक्कादायक घटना
घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, यल्लव्वा या महिलेच्या आईचे निधन होऊन अवघा आठवडा झाला होता. धार्मिक विधींसाठी ती माहेरी जाण्याच्या तयारीत होती. मात्र, पती शिवप्पा याने तिला घरी जाऊ नये, असा आग्रह धरल्याने दोघांत किरकोळ वाद झाला. हा वाद तीव्र झाल्यानंतर शिवप्पाने कुऱ्हाडीने यल्लव्वाच्या मानेवर व पाठीवर वार केले. गंभीर जखमांमुळे यल्लव्वाचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर शिवप्पानेही घरातच गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.








