- दि. २० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व शाळांना दसऱ्याची सुट्टी
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य शिक्षण विभागाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी दसऱ्याच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून राज्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांना २० सप्टेंबरपासून ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुट्टी राहणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकूण १८ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. शिक्षण विभागाने सांगितले की, शैक्षणिक वर्ष सुरू होताना नेहमीप्रमाणेच उपक्रम आणि सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक निश्चित करून सर्व शाळांना कळवले गेले होते.
घोषणेनुसार, दसऱ्याच्या सुट्ट्या २० सप्टेंबरपासून सुरू होऊन ७ ऑक्टोबरपर्यंत चालतील. त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून शाळांचा दुसरा शैक्षणिक टप्पा सुरु होईल आणि तो १० एप्रिल २०२६ पर्यंत राहणार आहे.सुट्टींचे हे वेळापत्रक आधीच सर्व शाळांपर्यंत पोहोचवण्यात आले असल्याचेही शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे.