- तांत्रिक समस्या उद्भवल्याने वाटप करण्यास विलंब
- राजशेखर तळवार यांची माहिती
बेंगळुरू : दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना दरमहा मोफत रेशन वितरण केले जाते. मात्र रेशन वितरण प्रकिया सातत्याने विस्कळीत होऊ लागली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेची गैरसोय होत आहे.
अन्नभाग्य योजने अंतर्गत माणसी १० किलो तांदूळ वितरीत केले जात आहेत. मात्र रेशन वितरणास विलंब होत आहे. जून महिना निम्मा संपला तरी अद्याप रेशन वाटप झाले नाही. दरम्यान १८ जून पासून रेशन वितरण सुरू केले जाईल अशी माहिती कर्नाटक राज्य सरकारी रेशन दुकान मालक संघटना उपाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी दिली आहे. दरम्यान लाभार्थ्यांना रेशनची प्रतीक्षा लागली आहे.








