रामनगर / वार्ताहर

रामनगर येथील जवान शशिकांत बावा (वय ४४) यांचे सैन्यदलात सेवा बजावत असताना मंगळवार दि. २९ जुलै रोजी रात्री निधन झाले. त्यांचे पार्थिव विमानाद्वारे बेळगाव येथे गुरुवारी आणण्यात आले. त्यानंतर गुरुवारी ३१ जुलै रोजी रामनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थितीत रामनगर हद्दीपासून शिवाजी चौक तसेच बाजारपेठेतून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता यावेळी सेना दलाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. जोयडा तहसीलदार मंजुनाथ मन्नाली, चंद्रशेखर हरिहर, रामनगर पीएसआय नायक व कडून सलामी देण्यात यावेळी हजारो नागरिकांच्या आली.