नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर २४ तासांत इराणविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (३१ मार्च) पहाटे इराणच्या इस्फाहन शहरातील दारुगोळ्याच्या कारखान्यावर अमेरिकेच्या हल्ल्याचा निशाणा लागला.

ट्रम्प यांनी हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, या हल्ल्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने या हल्ल्यासाठी २,००० पाउंड वजनाच्या बंकर-बस्टर बॉम्बचा वापर केला आहे. या प्रकारचे बॉम्ब जमिनीखाली असलेल्या गुप्त ठिकाणांना देखील उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहेत. हल्ल्यानंतर इस्फाहन परिसरात मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.