बंगळुरू : बंगळुरू डीजीपी रामचंद्र राव यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. डीजीपींनी हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असल्याचे म्हटले आहे.

बंगळुरूमध्ये तैनात असलेले डीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी डॉ. रामचंद्र राव यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक हादरून गेला आहे. व्हिडिओमध्ये अधिकारी आपला अधिकृत गणवेश परिधान करून सरकारी कार्यालयात कर्तव्यावर असताना एका महिलेशी असभ्य वर्तन करताना दिसत आहे. गुप्तपणे रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये अधिकारी महिलेला मिठी मारताना दिसत आहे. घटनेनंतर लगेचच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विभागाकडून सविस्तर माहिती मिळाली. व्हिडीओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्री संतापले आहेत. सध्या नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे महासंचालक म्हणून कार्यरत असलेले राव यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. डीजीपी रामचंद्र राव यांनी हा व्हिडीओ पूर्णपणे मॉर्फ केलेला आणि त्यांना लक्ष्य करण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. सरकार आता व्हिडिओची सत्यता आणि अनुशासनहीनतेच्या आरोपांची चौकशी करत आहे.