नवी दिल्ली : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील साखळी फेरीतील लढती शेवटच्या टप्प्यात असताना मंगळवारी बीसीसीआयने टाटा इंडियन प्रीमियर लीग २०२५ प्लेऑफच्या लढती कुठे खेळवण्यात येणार त्या संदर्भातील माहिती दिली आहे. भारत- पाक यांच्यातील तणावपूण परिस्थितीत आयपीएल स्पर्धा आठवड्याभरांसाठी स्थगित करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकात प्लेऑफ्सच्या सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. पण हे सामने कुठे खेळवण्यात येणार ते निश्चित नव्हते. पण आता प्लेऑफ्सच्या चार लढती कोणत्या मैदानात खेळवण्यात येणार ते स्पष्ट झाले आहे.

प्लेऑफ्सच्या दोन लक्तीसाठी हे ठिकाण झाले निश्चित न्यू चंदीगडमधील न्यू पीसीए स्टेडियमवर गुरुवारी २९ मे रोजी क्वालिफायर १ ची लढत खेळवण्यात येणार आहे. गुणतालिकेत आघाडीवर असणारे दोन संघ या लढतीत एकमेकांसमोर असतील. यातील विजेता संघ थेट फायनल गाठेल. शुक्रवारी ३० मे रोजी याच मैदानात एलिमिनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. ही लढत गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघामध्ये होईल, यातील पराभूत संघ स्पर्धे तून बाद होईल. विजेता संघ आणि क्वालिफायर १ मधील पराभूत संघ क्वालिफायर २ च्या लढतीसाठी अहमदाबादला रवाना होतील. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार फायनल जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम फायनलसह क्वालिफायर २ ची लढत खेळवण्यात येणार आहे. रविवारी १ जूनला पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजेता संघ यांच्यातल क्वालिफायर २ ची लढत अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यात येईल. यातील विजेता संघ बेट फायनलमध्ये पोहचलेल्या संघासोबत याच मैदानात ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. यंदाच्या हंगामातील फायनल सामना ३ जूनला नियोजित आहे.