• वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी : मालिकेत २ – १ ने अजिंक्य आघाडी

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या रोमांचक टी – २० मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २ – १ अशी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलिया संघाने चांगली सुरुवात करूनही १८.२ षटकांत सर्व गडी गमावून फक्त ११९ धावांवर गारद झाला.

  • ऑस्ट्रेलियाची धमाकेदार सुरुवात, पण शेवट खराब :

भारताच्या १६८ धावांचा पाठलाग करताना मॅथ्यू शॉर्ट आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची दमदार सुरुवात सुरुवात केली. मात्र, पाचव्या षटकात अक्षर पटेलने शॉर्टला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. शॉर्टने २५ धावा केल्या. तर नवव्या षटकात अक्षरने पुन्हा एकदा धक्का दिला आणि इंग्लिशला माघारी पाठवले. त्या वेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ६७ धावा होता.

मग शिवम दुबेने महत्वाच्या दोन विकेट घेतल्या, आधी कर्णधार मिचेल मार्श आऊट केले. मार्श ३० धावा करून बाद झाला. मग बाराव्या षटकात दुबेने टिम डेव्हिडलाही बाद केले. टिम डेव्हिड फक्त १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर चौदाव्या षटकात अर्शदीप सिंगने फिलिपचा विकेट घेतला, आणि त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ९८ धावा होता. १५ व्या षटकात वरुणने ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला आणि मॅक्सवेलला बाद केले. त्यानंतर सुंदरने स्टोइनिसला आणि पुढच्याच चेंडूवर त्याने बार्टलेटलाही बाद केले, यासोबत सुंदरने शेवटचीही विकेट घेतली.

भारताकडून या सामन्यात अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर व शिवम दुबे यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग व वरूणने १-१ विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने ८ चेंडूत ३ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली.

  • वादळी सुरुवात नंतर मिडिल ऑर्डर फेल :

प्रारंभी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. अभिषेक शर्मा व शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण अभिषेक शर्मा चांगल्या सुरूवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. अभिषेक शर्मा २१ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह २८ धावा करत बाद झाला. तर शुबमन गिलने ३९ चेंडूत ४६ धावांची खेळी करत बाद झाला. शिवम दुबे या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरला होता आणि त्याने २२ धावांची खेळी केली. या दोघांनाही नॅथन एलिसने क्लीन बोल्ड केले. यानंतर सूर्यकुमार यादवने १० चेंडूत दणदणीत २० धावांची खेळी केली, पण तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

यानंतर तिलक, जितेश ५ आणि ३ धावा करत बाद झाले. तर वॉशिंग्टनही १२ धावा करून माघारी परतला. अक्षर पटेलने या सामन्यात २१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यामुळे संघ ८ बाद १६७ धावा करण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस व झाम्पाने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर बार्टलेट व स्टॉयनिस यांनी १-१ विकेट घेतल्या.