खानापूर : समादेवी गल्ली येथील रहिवासी व जेष्ठ फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर गुरुसिद्धप्पा हेब्बाळकर (वय ९५) यांचे आज बुधवार दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. वृद्धापकाळाने निधन झाले. आज सायंकाळी ५ वाजता खानापूर येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुरुसिद्धप्पा हे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हेब्बाळकर यांचे वडील तर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सासरे होत. त्यांनी भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पीएलडी बँकेचे संचालक म्हणून काम केले होते, तसेच सामाजिक क्षेत्रातही स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला होता.
October 18, 2025
बेळगाव : माजी नगरसेविका, आदर्श सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा, समाजसेविका आणि आदर्श माता, शकुंतला बिरजे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अकराव्या दिनानिमित्त अल्प परिचय..सौ. शकुंतला अनिल […]