खानापूर / प्रतिनिधी
गोव्यातील फोंडा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये खानापूर तालुक्यातील तरुणाचा समावेश आहे. एका गुरुवारी दुपारी फोंडा बेतोडा परिसरात हा भीषण अपघात झाला. या घटनेत खानापूर तालुक्यातील २२ वर्षीय आदित्य देसाई याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला योगेश पाटील गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवर असलेल्या ईशा गावस (रा. केरी सत्तरी) यांचाही मृत्यू झाला आहे.