• ६.७० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
  • बैलहोंगल पोलिसांची कारवाई

बैलहोंगल / वार्ताहर

बैलहोंगल पोलिसांनी दोन प्रकरणांमध्ये महिलांना लुटणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. गोकाक तालुक्याच्या बेंचनमर्डी गावातील बसवराज सिद्धप्पा गोधी  (वय ३०), सिद्धरूढ मायाप्पा धर्मट्टी (वय २२), मुत्तेप्पा विठ्ठल किलारी (वय २५), बसवराज बीर, सिद्धप्पा पुजारी (वय २६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक केलेल्या आरोपींकडून १२.५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ५० ग्रॅम वजनाची सोन्याची घंटा आणि दोन सोन्याच्या साखळ्या तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ६.७० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बैलहोंगल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.