• व्होल्वो बसला अचानक आग  : २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

आंध्रप्रदेश : येथील कुर्नूल भागात गुरुवारी उशिरा रात्री एक भीषण अपघात घडला. हैदराबादवरून बंगळुरूकडे जाणाऱ्या व्होल्वो बसला अचानक आग लागून २० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, बसला दुचाकीची धडक बसल्यानंतर इंधनटाकीत स्फोट झाला आणि क्षणात आग भडकली. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. अपघात एवढा भीषण होता की अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.