खानापूर / प्रतिनिधी

रामनगर – आळणावर मार्गावर कुंभार्डा गावाजवळ आज गुरुवारी पहाटे घडलेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी वॉकसाठी गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली.रवळू भरमाणी चौधरी (वय ६२) आणि सीमा अमर हळणकर (वय ३०) दोघेही रा. कुंभार्डा अशी मृतांची नावे आहेत.

सकाळी ६.३० वा. सुमारास ही घटना घडली. धडक एवढी भीषण होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून, संबंधित वाहन कार असावे असा अंदाज आहे.अपघातात ठार झालेल्या सीमा हळणकर या सामाजिक कार्यकर्ते अमर हळणकर यांच्या पत्नी आहेत. तर चौधरी यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित व दोन अविवाहित मुली असा परिवार आहे.या घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थनाकात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.