बेळगाव / प्रतिनिधी

1 नोव्हेंबर 2024 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला होता. आणि मूक सायकल फेरीचे आयोजन केले होते. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि कर्नाटक विरोधी घोषणा देणे, भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण 45 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी ७ कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.

मार्केट पोलीस ठाण्यामध्ये सदर गुन्ह्याची नोंद झाली आहे. जेएमएफसी कोर्ट क्रमांक 2, बेळगाव येथे हा खटला सुरू असून, CC केस क्र. 716/2025 नुसार 7 मे 2025 रोजी पहिली सुनावणी पार पडली होती. पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे.

आजच्या सुनावणीत समिती कार्यकर्ते युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, मदन बामणे, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे, गणेश दड्डीकर, श्रीकांत कदम व गुंडू कदम यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला.

या खटल्याचे काम ॲड. एम.बी. बोंद्रे, .ॲड महेश बिर्जे, ॲड . वैभव कुट्रे आणि ॲड. अश्वजीत चौधरी यांनी पाहिले.