• १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

चित्रदुर्ग / वार्ताहर

चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यात गोरलत्तू क्रॉसजवळ खाजगी स्लीपर कोच बस आणि ट्रक यांच्यात भीषण धडक होऊन बसला अचानक आग लागली. या आगीत किमान १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. अपघाताची तीव्रता इतकी होती की बसमधील अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीमुळे संपूर्ण बस जळून खाक झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य सुरू आहे.