• हेस्कॉमच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप

बेळगाव / प्रतिनिधी

ट्रान्सफॉर्मरजवळ विजेचा धक्का लागून एका म्हशीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बसवन कुडची (ता. बेळगाव) येथे घडली आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. सदर म्हैस जिन्नप्पा वंडरोटी (रा. शास्त्री गल्ली ; बसवन कुडची) यांच्या मालकीची होती.

याबाबत प्राप्त माहितीनुसार जिन्नप्पा नेहमीप्रमाणे आपल्या सहा म्हशींना चारा चरण्यासाठी देवराज अर्स कॉलनीकडे घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये जिन्नप्पा वंडरोटी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हेस्कॉमने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी जिन्नप्पा यांनी केली आहे.