अंकोला : कारवार जिल्ह्याच्या अंकोला तालुक्यातील आगसूर गावात राष्ट्रीय महामार्ग ६६ वर सोमवारी पहाटे ३ वा. झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बेळगावहून मंगळुरूला जाणारी एक खासगी बस नियंत्रण गमावून आगसूरजवळील जगदीश धाब्यासमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. अपघाताच्या वेळी बसमधील प्रवासी झोपेत होते आणि बस कोसळल्याच्या आवाजाने ते जागे झाले. या अपघातात आणि काहीजण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तसेच अंकोला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य हाती घेतले. बसमध्ये अडकलेल्या एका मृतदेहाला बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे जखमींना अंकोला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी मंगळुरू रुग्णालयात नेण्यात आले.अंकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
October 18, 2025
विजयपूर / दिपक शिंत्रे विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील रामपूर परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक रेकॉर्डवरील गुन्हेगार ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृताचे नाव युनूस इक्लास […]