• बेळगाव – बागलकोट राज्य महामार्गावरील घटना 

बैलहोंगल / वार्ताहर

यरगट्टीहून बेळगावच्या दिशेने निघालेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण जखमी झाला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील सोमनट्टी गावाजवळ बेळगाव – बागलकोट राज्य महामार्गावर नेसरगी पोलिस स्थानकाच्या हद्दीत आज रविवारी ही घटना घडली.

सचिन यल्लप्पा बोरीमरद आणि बाळकृष्ण बसप्पा सुलढाल दोघेही (रा. करिकट्टी ता. बेळगाव) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर जखमी तरुणाला अधिक उपचारासाठी तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ. वीरैया हिरेमठ, पोलीस निरीक्षक गजानन नायक, उपनिरीक्षक ईरप्पा रिठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.