अथणी / वार्ताहर
अथणी शहरात दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स नावाच्या दुकानात दोघे हेल्मेट घातलेले दरोडेखोर हातात बंदुक घेऊन शिरले. ज्वेलर्सचे मालक महेश पोतदार (२५) हे दुकानात होते. दुकानावर दरोडा घालण्यासाठी दोघे आल्याचे लक्षात येताच मालकाने आरडाओरड केली. यामुळे चोर पळून गेले. ही घटना अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सदर प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्याच्या आधारावरून पोलीस यंत्रणा पुढील तपास करीत आहे. ज्वेलर्स दुकान फोडण्याच्या या प्रयत्नामागे आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.