• ५० मी. फ्रीस्टाईल – २५ मी. बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदकांची कमाई

बेळगाव : चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशनच्या वतीने आयोजित जलतरण स्पर्धेत भारतासह दहा देशांतील जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता. या प्रतिष्ठित स्पर्धेत बेळगावचा मयांक हलदर याने भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. ५० मीटर फ्रीस्टाईल आणि २५ मीटर बॅकस्ट्रोक या दोन प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई करून त्याने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर बेळगावचे नाव उज्ज्वल केले.

या यशाबद्दल आबा स्पोर्ट्स क्लब, हिंदी स्पोर्ट्स क्लब आणि क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मयांकच्या बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमनावेळी त्याचा सत्कार करण्यात आला.

या सत्कारप्रसंगी मयांकचे आई-वडील उपस्थित होते. तसेच आबा स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांच्यासह विशाल वेसने, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, सुधीर धामणकर, मोहन पत्तार, सूर्यकांत हिंडलगेकर, पद्मप्रसाद हुली, गणेश दड्डीकर, हर्षाली पाटील, अनंत पाटील आदि मान्यवर क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.