रामनगर / प्रतिनिधी

अनमोड घाटातील गोवा हद्दीत डांबरी रस्ता कोसळल्याने मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी पाच जुलैपासून २ सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा तसेच बसेस वगळून सर्व वाहनांना मार्ग बंदीचा आदेश दिला होता. पावसाच्या जोरामुळे रस्ता कोसळलेल्या ठिकाणी आदेश न मिळाल्याने असल्याचे दारबंदोड्याच्या काम करणे अडचणी होत पुन्हा दोन महिन्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आहे. तसेच अजूनही मुख्य कालावधीसाठी अनमोड घाट काम करण्याच्या प्रक्रियेचा मार्ग बंद करण्यात येणार सांगण्यात आले. पूर्वी दिलेला आदेशामध्ये आणखी दोन महिन्यांचा कालावधी वाढून देण्याची मागणी एन. एच. विभागातर्फे करण्यात आली असून, सध्या अवजड वाहनांना घाट मार्गावरून सोडल्यास रस्ता कोसळलेल्या ठिकाणी काम करण्यास व्यत्यय येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा आणखीन दोन महिन्यांसाठी अनमोड घाट मार्ग बंदचा आदेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.