खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील संगरगाळी गावात २०२४ साली घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, खानापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत न्यायालयाने कठोर निर्णय दिला आहे.

पहिल्या प्रकरणात, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे विष्णू परशुराम कडोलकर (वय ३५) याला बेळगाव येथील विशेष पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी जन्मठेप आणि ३०,००० रुपयांचा दंड ठोठावला.