बेळगाव / प्रतिनिधी

विद्यानगर बॉक्साईट रोड येथील आधार शिक्षण संस्थेमध्ये श्री धन्वंतरी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये संस्थेतील वैद्यकीय अभ्यासक्रम विभागांच्या वतीने धन्वंतरी पूजन करून याचे महत्त्व सांगण्यात आले. संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांनी यावेळी धन्वंतरी पूजनाचे महत्त्व सांगितले. धनत्रयोदशीचा दिवस हा धनाची पूजा करण्याचा दिवस आहे. त्याचप्रमाणे आरोग्याची देवता असणाऱ्या धन्वंतरीच्या पूजनाचा देखील दिवस आहे. असे त्यांनी सांगितले. या उपक्रमात शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज तसेच बामणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संस्थेतील सर्व डॉक्टर्स, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले होते.