• दोन्ही वाहनांचे चालक गंभीर

चिक्कोडी / वार्ताहर

चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर शहरात निपाणी – मुधोळ मार्गावर केएसआरटीसी बस आणि ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक दोन्ही पूर्णपणे चक्काचूर झाले. ट्रकच्या आत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना खूप प्रयत्न करावे लागले. बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून, त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.