- मिरज – जमखंडी राज्य महामार्गावरील वाहतूक बंद
रायबाग /वार्ताहर
महाराष्ट्रातील पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला असून, बेळगाव जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे कुडची उगारखुर्द मध्येला जोडणारा पूल पूर्णत: बुडाला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा दुवा असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील कुडची पुलावरून दररोज शेकडो बस आणि वाहने ये – जा करतात. त्यामुळे पोलिसांनी पुलावर बॅरिकेड्स लावले आहेत. परिणामी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.
सध्या कृष्णा नदीत १ लाख ५० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे आणि नदीपात्रात पूर येण्याचा धोका आहे.