- निवेदन देण्यास मुभा ; परवानगी नाकारली
बेळगाव : कन्नडसक्तीच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दिनांक ११ रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी शहर उपनगर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सोमवारच्या मोर्चाला मोठ्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित राहणार अशीच दाट शक्यता आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने आज महाराष्ट्र एकीकरण समितीला महामोर्चा रद्द करावा आणि केवळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्यावी अशी सूचना केली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महामोर्चासाठी प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली होती.या संदर्भात पोलीस प्रशासनाने महामोर्चामुळे वाहतुकीला अडथळा तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास निर्माण होईल , शांतता ही भंग होईल या कारणास्तव महा मोर्चाला परवानगी नाकारली आहे. महामोर्चा ऐवजी केवळ निवेदन देण्यात यावे असे म.ए समितीला सूचित करण्यात आले आहे.