बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने कन्नडसक्ती संदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उद्या सोमवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्याचे ठरले आहे. तरी बेळगाव येथून निघणाऱ्या मराठी भाषिकांनी उद्या सकाळी १०.३० पर्यंत मराठा मंदिर कार्यालय येथे एकत्र येऊन खानापूरला जायचे असून खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल येथे ठीक ११ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.