• सुदैवाने दोघेजण बचावले

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर – जांबोटी – चोर्ला मार्गावर चिखलेनजीक गोव्याकडे जाणारी एक कार पलटी झाली. सोमवारी २१ जुलै रोजी ही घटना घडली. मात्र या घटनेत दोघेजण सुदैवाने बचावले.या अपघातामुळे सदर मार्गावरील वाहतुक बराच वेळ विस्कळीत झाली होती परंतु नागरिकांनी कार बाजूला केल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली.

खानापूर तालुक्यातील जांबोटी-चोर्ला-गोवा मार्गावरून मोठ्या प्रमाणात एम शांड वाळूची वाहतूक होत असल्याने, वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून वाळू रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारी लहान मोठी वाहने रस्त्यावरून घसरत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वरचेवर अपघात होत आहेत. अशा निष्काळजीपणामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.