खानापूर / प्रतिनिधी
खानापूर येथील मारवाडी समाजातील ६५ वर्षीय नागरिक व सूर्या सॉ मीलचे मालक दयालाल कर्षन पटेल, हे मंगळवार दि. ८ जुलै पासून बेपत्ता झाले होते. त्यांचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत होता. दरम्यान मंगळवारी सायंकाळी मलप्रभा नदी घाटावर त्यांच्या चप्पल आढळल्यामुळे, संशय बळावल्याने मलप्रभा नदी पात्रात सुद्धा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु त्यांचा शोध लागत नव्हता. शेवटी आज शुक्रवारी १२ वाजण्याच्या दरम्यान खानापूर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतला असता मृतदेह एका बांबूच्या झुडपाखाली अडकलेल्या स्थितीत सापडला आहे. बेळगाव गोवा महामार्गावरील कुपटगिरी नजीक असलेल्या पुलापासून काही अंतरावर नदीच्या पाण्यातून त्यांचा मृतदेह, खानापूर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढला.