मण्णूर : मण्णूर (ता. जि. बेळगाव) येथील जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित मण्णूर संचलित जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशनतर्फे मण्णूर गावातील मराठी प्राथमिक शाळा व कन्नड प्राथमिक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
फौंडेशनचे अध्यक्ष एल. के. कालकुंद्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती फोटोचे पूजन सर्व महिला संचालकांच्या हस्ते, तसेच दिपप्रज्वलन फौंडेशनचे अध्यक्ष कालकुंद्री व संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांच्या हस्ते व व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक व सल्लागार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक महेश काकतकर यांनी केले. त्यानंतर शाळेतील गरजू व गरीब मुलांना वही, अंकलिपी व पेन्सिल पट्टीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आतापर्यंत फौंडेशन मार्फत राबविण्यात आलेल्या मुलांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा, कोरोना काळात आर्सेनिक अलबम या गोळ्यांचे वाटप, गावातील माजी सैनिकांचा सत्कार, गावातील 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम वगैरे विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच या पुढेही ही संस्था समाज कार्यात अग्रेसर राहील, असे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमास चेअरमन लक्ष्मण मंडोळकर, व्हा चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, ब्रिजेश देवरमनी, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार परशराम कदम, शीतल चौगुले, लता कडोलकर, जयवंत मंडोळकर यांच्यासह निमंत्रित, हितचिंतक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.