बेळगाव : चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे आयोजन उत्साहात करण्याचा निर्णय मंदिर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला असून रविवारी दि. ४ मे रोजी रात्री ब्रम्हलिंग भजनी मंडळ चलवेनहट्टी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ५ मे रोजी सकाळी ७.०० वाजता देवाला अभिषेक घालण्यात तसेच सकाळी सात ते अकरा या वेळेत स्वराली संगीत कलामंच चलवेनहट्टी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम येणार आहे. त्यानंतर राजा पंढरीचा महिला हरिपाठ चलवेनहट्टी यांचा हरिपाठचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच दुपारी १२ वाजता महाप्रसादाला सुरूवात होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी संगीत भजनाच्या कार्यक्रमासह अभिषेक तसेच महाप्रसादचा लाभा घ्यावा, असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान कमिटीने केले आहे.
October 21, 2025
सौंदत्ती / वार्ताहर कंडक्टर पत्नीचा निर्घृण खून करून फरार झालेल्या पोलीस शिपायाला अटक करण्यात अखेर बेळगाव पोलिसांनी यश मिळवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत […]