खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील सावरगाळी मार्गे हत्तींचा एक कळप नंदगडच्या वाडीमाळ-गवळीवाडा परिसरात दाखल झाला आहे. सुमारे चार ते सहा हत्तींच्या या कळपातील एक-दोन हत्ती समूहापासून वेगळे झाल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी हे हत्ती नावगा वनक्षेत्रात दिसले होते. आता नंदगड परिसरात दाखल झाल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः भात पिकांच्या पेंढ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

हत्ती मानवी वस्तीजवळ येऊ नयेत यासाठी वन विभागाने सतर्कता वाढविली आहे. वनविभाग अधिकारी माधुरी दळवाई आणि गस्ती कर्मचारी प्रशांत शंकर तारीहाळ, गुरु कुंभार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसराची सतत पाहणी सुरू ठेवण्यात आली आहे.