अथणी / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील येल्लमावाडी गावात ऊसाने भरलेली ट्रॉली उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रामप्पा निंगप्पा सावळगी (वय ४०) असे मृताचे नाव आहे. अमावस्येनिमित्त यल्लमा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

सावळगी-अथणी राज्य महामार्गावर काम सुरू असताना, ऊसाने भरलेला ट्रॅक्टर जवळच असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला आणि दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या खाली सापडला. ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे.