• येडूर येथील दुर्घटना : लोंबकळणाया तारांमुळे घटना  
  • भरपाई देण्याची मागणी

येडूर / वार्ताहर

येडूर येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ब्बल ५० एकरातील ऊस पीक जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी सकाळी येडूर येथे घडली. यामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशा मागणी होत आहे.

सकाळच्या सुमारास लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमध्ये घर्षण होताना ठिणगी पडल्याने उसाच्या फडास आग लागली.वाऱ्याचा वेग वाढल्याने आग नियंत्रणाबाहेर गेली. ग्रामस्थांनी स्वत:च्या प्रयत्नाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु भीषण आगीचा विस्तार प्रचंड असल्याने अग्निशमन तदलाला पाचारण करावे लागले. बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत मोठ्या प्रमाणात उसाचे पीक जळून गेले होते. यावेळी आग विझवण्यासाठी चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडी व सदलगा अग्निशमन दलाची मदत बणाऱ्या विद्युत घेण्यात आली होती. पण आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील ५० एकर ऊस आगीत जळाला.

सुरेश कागवाडे, महेश कागवाडे, चंद्रशेखर कागवाडे, बाळू कागवाडे, इरगोंडा पाटील, प्रकाश मिरजे, सदाशिव मिरजे, अशोक मिरजे, वसंत शिंदे, मारुती शिंदे, शिवाजी शिंदे, रामा शिंदे, शंकर शिंदे, आण्णाप्पा नोरजे, धोंडिबा सूर्यवंशी, नेमण्णा अम्मणगी, सतीश चव्हाण, राजू चव्हाण, सचिन चव्हाण, बाबू चव्हाण, विठ्ठल खडके, शिवाजी खडके, प्रशांत उमराणे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एक वर्षभर केलेल्या कष्टाचे पीक क्षणात जळून गेले आहे. शासनाने तातडीने मदत करावी, असे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम झाला असून राज्य सरकारने साहाय्य केले तरच पुढील हंगामाचे पीक घेता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विद्युत मंडळाने जुन्या आणि जीर्ण वीजतारा तातडीने बदल्याची गरज आहे. शेती भागात तारांची उंची वाढवून सुरक्षितता वाढवणे गरजेचे आहे. आता प्रशासनाने यातून धडा घेऊन संपूर्ण परिसरातील वीज तारा बदलणे नव्हे तर सुरक्षित शेतीसाठी वेगळा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. नाहीतर अशा घटना पुन्हा घडू शकतात, अशी स्थानिक ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.