- दुंडाप्पा कोमार यांची बदली
खानापूर / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य सरकारने अखेर खानापूर तहसीलदारांच्या बदलीचा आदेश जारी केला असून मंजुळा नाईक यांची खानापूरच्या नूतन तहसिलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून आज अधिकृत आदेश प्रसिद्ध झाला.
मागील आठवड्यात माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने एका “कंटेम्प्ट ऑफ कोर्ट” प्रकरणात खानापूरच्या विद्यमान तहसीलदारांची एक आठवड्यात बदली करण्याचे निर्देश दिले होते. या न्यायालयीन आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत राज्य सरकारने आज बदलीची नोटिफिकेशन काढली. सरकारच्या कागदपत्रानुसार, नवीन बदली आदेश जारी करण्यात आला असून खानापूरसाठी नवीन तहसीलदार म्हणून मंजुळा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन तहसीलदार म्हणून मंजुळा नाईक लवकरच रुजू होणार असून, त्यांच्या कामकाजाबद्दल तालुक्यात सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. महसूल विभागाने जारी केलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, नवीन नियुक्त अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यभार स्वीकारावा असा आदेश दिला आहे.








