- लोकोळी परिसरात शोककळा
खानापूर / प्रतिनिधी
सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या पोहताना मलप्रभा नदीत बुडालेल्या प्रथमेश रवींद्र पाटील (वय १८ रा. लोकोळी , ता. खानापूर) या तरुणाचा मृतदेह रविवार दि. २६ ऑक्टोबर सकाळी सापडला आहे. शुक्रवारी सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या प्रथमेशचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.
घटनेनंतर शनिवारी सकाळपासून अग्निशामक दलाचे जवान, तसेच एसडीआरएफ रेस्क्यू पथक आणि स्थानिक युवकांनी शोधमोहीम राबवली होती. मात्र, अख्खा दिवस शोधकार्य चालूनही मृतदेहाचा मागमूस लागला नव्हता.
आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू झाल्यानंतर घटनास्थळापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर मृतदेह तरंगताना आढळला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेने लोकोळी आणि परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी या तरुणाच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.







