अथणी / वार्ताहर

अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सत्ती गावाबाहेर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोराची होती की दुचाकीवरील दोघे तरुण घटनास्थळीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अथणी पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.