बेळगाव / प्रतिनिधी
स्टिअरिंग लॉक झाल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि के.एस.आर.टी.सी.ची बस खड्डयात पडल्याची घटना बेळगावमधील कवेम्पू नगरात घडली आहे. मंगळवारी बेळगावमधील कवेम्पू नगरात स्टिअरिंग लॉक झाल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती खड्डयात पडली. ही बस बेळगावच्या केंद्रीय बस स्थानकातून सह्याद्री नगरकडे निघाली होती. बसमध्ये अडकलेल्या वाहकाला आणि प्रवाशांन स्थानिकांनी बाहेर काढले. बसमधील १५ प्रवासी सुखरूप असून, केवळ वाहक आणि एका मुलीला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.