दुबई : आशिया कप २०२५ मधील सर्वात रोमांचक सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले आहेत. हा सामना आज रविवारी, १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १२७ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १२८ धावांचे आव्हान ठेवले. अखेरच्या काही षटकांमध्ये शाहीन आफ्रिदीच्या आक्रमक खेळीमुळे पाकिस्तानला हा चांगला स्कोअर उभारता आला.
आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. आता भारतीय फलंदाज हे लक्ष्य किती षटकांत गाठतात, याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या उद्दिष्ठाचा पाठलाग करताना भारताने ५ षटकांत एक विकेट गमावून ४८ धावा केल्या आहेत.