खानापूर / प्रतिनिधी
अनमोड तपासणी नाक्यावर झालेल्या कारवाईत राज्य अबकारी विभागाने सुमारे ५.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या ३५ लिटर दारूसह एक टोयोटा कार जप्त करण्यात आली असून, संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सकाळी अनमोड चेकपोस्टवर करण्यात आली. टोयोटा इटिओस या कारची थांबवून तपासणी केल्यावर कारच्या डिकीत एक मोठी प्लास्टिकची पिशवी आढळली. त्या पिशवीत गोवा बनावटीचे मद्य आढळले.
सदर कारवाईत या कारमध्ये रॉयल स्टॅग २ लिटरच्या १० बाटल्या, रॉयल स्टॅग ७५० मिलीच्या ७ बाटल्या, इम्पिरियल ब्लू ७५० मिलीच्या ५ बाटल्या आणि बुलेट फेणीच्या ७ बाटल्या सापडल्या. एकूण मिळून ३५ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे, ज्याची अंदाजित किंमत ५२,९०० रुपये इतकी आहे. या दारूची वाहतूक बेकायदेशीररीत्या केली जात होती.

