Nippani Archives | News 24 Tass Marathi

कुर्ली-आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथांची पौर्णिमा यात्रा २६ ऑक्टोबरपासून
३० ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविकांची उपस्थिती

निपाणी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भोंब पौर्णिमेनिमित्त होणारी पाचदिवसीय यात्रा २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेच्या पहिल्या दिवशी, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी श्रींची पालखी व सबिना सोहळा होईल. रात्री ढोलजागराचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबर रोजी रात्री ढोलजागरानंतर श्रींची पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी रात्री श्रींची पालखी सबिना प्रदक्षिणा होईल. त्यानंतर उत्तररात्री नाथांची पहिली भाकणूक होणार आहे.

२९ ऑक्टोबरला यात्रेचा मुख्य दिवस

२९ ऑक्टोबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून, दिवसभर महानैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा काढण्यात येईल. त्यानंतर उत्तररात्री नाथांची मुख्य दुसरी भाकणूक होईल.

३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होऊन पाचदिवसीय यात्रेची सांगता होईल.

दरवर्षी भोंब पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होते. नाथांचे निस्सीम भक्त भगवान डोणे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे (वाघापूरकर) यांच्याकडून भाकणूक केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक या यात्रेसाठी कुर्ली-आप्पाचीवाडी येथे दाखल होत असतात.

The post कुर्ली-आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथांची पौर्णिमा यात्रा २६ ऑक्टोबरपासून appeared first on News 24 Tass Marathi.

संत बाळूमामा मंदिर २ ते ५ ऑक्टोबरदरम्यान दर्शनासाठी बंद
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची स्वच्छता

अन्नछत्रही राहणार बंद, देवस्थान समितीचे भाविकांना आवाहन

निपाणी : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत बाळूमामा मंदिर शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामासाठी २ ते ५ ऑक्टोबरदरम्यान दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मंदिरासह अन्नछत्रही बंद राहणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि कार्याध्यक्ष रामण्णा मरेगुद्री यांनी दिली.

संत बाळूमामा मंदिरात अमावास्या, रविवार तसेच अन्य दिवशीही विविध राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर नेहमी खुले ठेवण्यात येते. मात्र, शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीचा भाग म्हणून मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात येणार असल्याने चार दिवस दर्शनाची सुविधा बंद राहणार आहे.

याशिवाय, ५ ऑक्टोबर रोजी निवासस्थानही बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन देवस्थान समितीला सहकार्य करावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

The post संत बाळूमामा मंदिर २ ते ५ ऑक्टोबरदरम्यान दर्शनासाठी बंद appeared first on News 24 Tass Marathi.

तवंदी घाटात मिनी बसला भीषण आग ; १२ भाविक थोडक्यात बचावले
गणपतीचे दर्शन घेऊन परतताना दुर्घटना

शॉर्टसर्किटमुळे बस जळून खाक

सुमारे १२ लाखांचे नुकसान

निपाणी : संकेश्वर येथील निलगार गणपतीचे दर्शन घेऊन इचलकरंजीकडे परतणाऱ्या एकाच कुटुंबातील १२ भाविकांच्या मिनी बसला तवंदी घाटातील उतारावर रविवारी दुपारी अचानक आग लागली. बसमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. त्यानंतर बसमधील सर्व १२ भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली ; मात्र आगीत मिनी बस पूर्णपणे जळून खाक झाली.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बसला वेढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपनिरीक्षक गंगापा पुजेरी यांनी निपाणी आणि संकेश्वर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. रस्ते देखभाल करणाऱ्या अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे हेही सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाचे निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी मनोहर बिलामारी, सी. एस. पम्मार, सचिन कट्टी आणि रवी हेगडे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत मिनी बस पूर्णपणे जळून मोठे नुकसान झाले होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील १२ भाविकांचे प्राण वाचले.

The post तवंदी घाटात मिनी बसला भीषण आग ; १२ भाविक थोडक्यात बचावले appeared first on News 24 Tass Marathi.

डॉ. संजय पंतबाळेकुंद्री वैद्यकीय सेवा पुरस्काराने सन्मानित
प. पू. डॉ. रमेश महाराज अकोळकर प्रतिष्ठानतर्फे गौरव

बेळगाव : प.पू. कै. डॉ. रमेश महाराज अकोळकर यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त-पंढरी (अकोळ) येथे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना “प.पू. सद्गुरु डॉ. रमेश महाराज अकोळकर प्रतिष्ठान” यांचा २०२६ सालचा वैद्यकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. पंतबाळेकुंद्री यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

पंतबाळेकुंद्री कुटुंबाने गेल्या तीन पिढ्यांपासून अखंडपणे वैद्यकीय सेवा बजावली आहे. महापुराच्या काळात केलेली वैद्यकीय मदत, कोविड महामारीदरम्यान दिलेली विनामूल्य आरोग्यसेवा तसेच आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी निपाणी येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. ईश्वर ढोले यांचाही वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात कोल्हापूरच्या प्रसिद्ध गायिका सौ. रमा कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्तिगायनालाही उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या कलासेवेसाठी त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच श्री दत्त-पंढरी मंदिरातील अविरत सेवा बजावणाऱ्या सेवेकऱ्यांचाही प्रतिष्ठानतर्फे शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

दुपारी अभिषेक, आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यास पंचक्रोशीसह विविध भागांतील गुरुबंधू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post डॉ. संजय पंतबाळेकुंद्री वैद्यकीय सेवा पुरस्काराने सन्मानित appeared first on News 24 Tass Marathi.

आवास योजनेचा रखडलेला निधी तातडीने मंजूर करा
भोज ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांसाठीचा पुढील अनुदान हप्ता वर्षभरानंतरही मिळाला नसल्याने निपाणी तालुक्यातील भोज गावातील लाभार्थ्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गावातील अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली असली, तरी पुढील अनुदान न मिळाल्यामुळे घरांची बांधकामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभावती अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील १० ते १५ कुटुंबांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र, पाया बांधकामासाठी सुरुवातीला केवळ ३० हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला असून, त्यानंतरचा निधी अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरांची बांधकामे रखडली असून लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, पावसामुळे अर्धवट घरे खराब होत असून, जुनी घरे पाडल्यानंतर नवीन घरे पूर्ण न झाल्याने अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे. रखडलेला निधी तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

The post आवास योजनेचा रखडलेला निधी तातडीने मंजूर करा appeared first on News 24 Tass Marathi.

महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे चिक्कोडी – निपाणीतील सखल पूल पाण्याखाली
कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांची पाणीपातळी वाढली

निपाणी : महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता सीमाभागातही जाणवू लागला आहे. कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील अनेक सखल पूल पाण्याखाली गेले असून, नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील जलसंधारण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या काही तासांत नदीची पाणीपातळी सुमारे दोन फूटांनी वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या महाराष्ट्रातून कृष्णा नदीत सुमारे ८७ हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत आहे. परिणामी, चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील नदीकाठावरील सर्व सखल पूल पाण्याखाली गेले आहेत.

नदीची पाणीपातळी वेगाने वाढत असल्याने चिक्कोडी आणि निपाणी तालुका प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नागरिक आणि जनावरे नदीकाठी जाऊ नयेत यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, नदी परिसरात अनावश्यक वावर टाळण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच नदीकाठी जाणे आणि जनावरे चरण्यासाठी नदी परिसरात नेणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

The post महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे चिक्कोडी – निपाणीतील सखल पूल पाण्याखाली appeared first on News 24 Tass Marathi.

निपाणी महामार्गावरील संरक्षक भिंत कोसळली
काम पूर्ण होण्यापूर्वीच भिंत जमीनदोस्त

बांधकामाच्या दर्जावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

निपाणी : राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामादरम्यान उभारण्यात आलेली संरक्षक भिंत अचानक कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काम पूर्ण होण्यापूर्वीच भिंत कोसळल्याने स्थानिक नागरिकांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना ही घटना घडल्याने वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप प्रकल्प पूर्ण झालेला नसतानाच संरक्षक भिंत कोसळल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकामाच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी करण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

The post निपाणी महामार्गावरील संरक्षक भिंत कोसळली appeared first on News 24 Tass Marathi.

निपाणीनजीक कार – दुचाकीचा भीषण अपघात
दुचाकीस्वार जागीच ठार ; पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी

निपाणी : निपाणी-मुडगोड मार्गावरील देवचंद कॉलेजजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारमधील दोघेजण घटनास्थळावरून पसार झाले असून, उर्वरित दोघांना संतप्त नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

कोडणी गावातील शिवाजीराव प्रभाकर शिंदे (वय ३३) यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी नीता शिंदे (३०) आणि मुलगा श्रवण (९) गंभीर जखमी झाले असून, मुलगी राधिका (१२) किरकोळ दुखापतींसह बचावली आहे.

शिवाजीराव शिंदे हे निपाणीतील बेळगाव नाका परिसरात लॉन्ड्री व्यवसाय करत होते. रविवारी सुट्टी असल्याने पत्नी आणि दोन मुलांसह ते निपाणीतील नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. जेवण उरकून कोडणीकडे परतत असताना सावंतवाडीहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने हालसिद्धनाथ सर्व्हिसिंग सेंटरसमोर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. शिवाजीराव यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. मुलगा श्रवणच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून पत्नीचा उजवा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच कोडणी गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने निपाणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मध्यरात्री शिवाजीराव यांचा मृत्यू झाला. पत्नी आणि मुलगा श्रवण यांच्यावर सध्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृताच्या बहिणी सुजाता राजेंद्र परीट यांनी तक्रार दिली आहे. अपघातानंतर फरार झालेल्या दोघांचा शोध सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत शिवाजीराव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

The post निपाणीनजीक कार – दुचाकीचा भीषण अपघात appeared first on News 24 Tass Marathi.

मुसळधार पावसामुळे बेळगाव, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील शाळांना उद्या बुधवारीही सुट्टी
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा आदेश

बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बुधवार, दि. ८ जुलै रोजी बेळगाव शहर व ग्रामीण, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुट्टी केवळ अंगणवाडी केंद्रे तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी लागू असून, इतर शैक्षणिक संस्थांबाबत कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.

The post मुसळधार पावसामुळे बेळगाव, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील शाळांना उद्या बुधवारीही सुट्टी appeared first on News 24 Tass Marathi.

निपाणीजवळ ट्रक – कारचा भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू
स्थवनिधी घाटातील घटना ; ब्रेक निकामी झालेल्या ट्रकची कारला धडक

निपाणी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील स्थवनिधी घाट परिसरात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

मृतांची ओळख कोल्हापूर येथील सोयल मुनेर (वय ३६) आणि इचलकरंजी येथील विनय पाटील अशी झाली आहे. अपघातातील दोन जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्थवनिधी घाट उतरत असताना ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कार पूर्णपणे चेंगरली गेली आणि कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच निपाणी पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य करून जखमींना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी वाहने पर्यायी मार्गाने वळवून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटविण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

या प्रकरणी निपाणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.

The post निपाणीजवळ ट्रक – कारचा भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.