International Archives | News 24 Tass Marathi

येळ्ळूरच्या श्रीशा तारीहाळकरची इंग्लंडमध्ये गरुडभरारी
ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त विजेतेपद

बेळगाव : येळ्ळूर (संभाजी गल्ली) येथील मूळ रहिवासी असलेल्या तारीहाळकर कुटुंबातील कु. श्रीशा सुहास तारीहाळकर हिने इंग्लंडमध्ये आपल्या बुद्धिबळ कौशल्याची चमक दाखवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रतिष्ठेच्या ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत १० वर्षांखालील गटात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना श्रीशाने संयुक्त विजेतेपद पटकावले आहे. अवघ्या नवव्या वर्षी मिळवलेल्या या यशामुळे येळ्ळूरसह कोल्हापूर परिसराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

श्रीशाचे वडील सुहास बाबूराव तारीहाळकर हे येळ्ळूर (संभाजी गल्ली) येथील मूळ रहिवासी असून, सध्या नोकरीनिमित्त इंग्लंडमधील लेमिंग्टन शहरात वास्तव्यास आहेत. श्रीशा तेथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच बुद्धिबळाची आवड जोपासत आहे.

लहान वयातच बुद्धिबळाच्या पटावर आपल्या खेळाची छाप पाडणाऱ्या श्रीशाने ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत १० वर्षांखालील गटात इंग्लंडकडून सहभाग घेत संयुक्त विजेतेपद मिळवले. तिच्या या कामगिरीमुळे तारीहाळकर कुटुंबीयांसह येळ्ळूरमधील ग्रामस्थ आणि कोल्हापूर परिसरातील नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

श्रीशा ही कोल्हापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक बाबूराव मल्लाप्पा तारीहाळकर यांची नात आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तारीहाळकर कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

The post येळ्ळूरच्या श्रीशा तारीहाळकरची इंग्लंडमध्ये गरुडभरारी appeared first on News 24 Tass Marathi.

अमेरिकेत गाजली ‘वाऱ्यावरची वरात’
बेळगाव : कॅलिफोर्निया येथील ‘बे एरिया’ तील प्लेझन्टन शहरात रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ‘वाऱ्यावरची वरात’ चा प्रयोग सादर करण्यात आला. येथील ‘बे फ्रेंड्स’ आयोजित आणि ‘कुंकु प्रॉडक्शन्स’ निर्मित हा नाट्याविष्कार विलो रोड वरील जय गणेश स्टुडिओमधे संपन्न झाला. मूळलेखन पु. ल. देशपांडे यांचे असून मेधा मराठे यांनी संपादित केलेल्या ‘वरातीचे’ दिग्दर्शन जगदीश कुंटे यांनी केले .

बेळगाव व नाशिक येथील तसेच कॅलिफोर्निया मधील, मुख्यतः कुंटे आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्य या प्रयोगात सहभागी झाले होते. प्रथम भालचंद्र कुंटे यांनी बेळगावचे कवि अविनाश ओगले यांच्या निवडक विडंबन कविता सादर केल्या. त्यात भूगोलाच्या बाई, सौभाग्यवतीला ताप म्हणालो, पुण्याचे प्रदूषण, मिसळ चापतो तर्रीची, कंट्रोल झेड आणि कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ चे विडंबन सादर केले.

मध्यंतरानंतर ‘वाऱ्यावरची वरात’ चा बहारदार प्रयोग झाला. त्यात मंदार, वीणा, अपूर्वा, नील, भालचंद्र, महिमा, नीता, मिलिंद आणि जगदीश ही कुंटे मंडळी; निहार, स्वप्नाली आणि उर्वी हे कुलकर्णी कुटुंबीय तसेच अजित रानडे व आझाद दहिया यांनी भाग घेतला. पार्श्वसंगीत अमेय पोतदार यांचे तर निवेदन प्रणाली उबाळे यांचे होते.

प्रयोगाला बे एरिया मधील सुजाण प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्षणोक्षणी प्रेक्षक हास्यकल्लोळात डूबत होते आणि सभागृह डोक्यावर घेत होते. प्रयोगाला उस्फूर्त प्रतिसाद मिळून प्रयोग हाऊसफुल्ल झाला. बे फ्रेंड्सच्या हेमाली गोंधळेकर आणि सहकारी यांनी प्रयोग यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

तीन पिढ्यांचा सहभाग

मुख्यतः कुंटे व कुलकर्णी कुटुंबातील सदस्य या प्रयोगात सहभागी होते एवढेच वैशिष्ट्य नव्हते तर या नाट्यविष्कारात एकाच वेळी तीन पिढ्यातील सदस्य सामील होते. जगदीश कुंटे यांनी पु ल देशपांडे यांची, त्यांचे चिरंजीव मंदार यांनी सूत्रधाराची तर त्याचा मुलगा नील याने पाताडे सायकल मार्ट च्या प्रतिनिधीची भूमिका साकारली होती.

The post अमेरिकेत गाजली ‘वाऱ्यावरची वरात’ appeared first on News 24 Tass Marathi.

कॉमनवेल्थमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वातिक पाटीलचा सत्कार
स्विमर्स क्लब बेळगावकडून गौरव

बेळगाव : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पॅरा जलतरणपटू स्वातिक पाटील यांनी पाचवे स्थान पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल स्विमर्स क्लब बेळगावतर्फे सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल येथे त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.

स्वातिक पाटील यांच्या या यशामागील जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या सत्कार समारंभाला स्विमर्स क्लब बेळगावचे मुख्य मार्गदर्शक उमेश जी. कलघटगी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशिक्षक अक्षय शेरेगर, नितीश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांनी स्वातिक यांचे अभिनंदन करत भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वातिक पाटील यांचा प्रवास हा समर्पण, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे मान्यवरांनी सांगितले. त्यांच्या यशामुळे बेळगावसह संपूर्ण देशाची मान उंचावली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

The post कॉमनवेल्थमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वातिक पाटीलचा सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

अमेरिकेत ‘वाऱ्यावरची वरात’
कॅलिफोर्निया ‘बे एरिया’ तील रसिकांसाठी २ ऑगस्टला विशेष प्रयोग

हाऊसफुल्ल प्रतिसाद

बेळगाव : कॅलिफोर्निया येथील ‘बे एरिया’ तील प्लेझन्टन शहरात रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी ‘ वाऱ्यावरची वरात ‘ चा प्रयोग करण्यात येणार आहे. येथील ‘ बे फ्रेंड्स ‘आयोजित आणि’ कुंकु प्रॉडक्शन्स ‘ निर्मित हा नाट्याविष्कार विलो रोड वरील जय गणेश स्टुडिओ येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मूळ लेखन पु. ल. देशपांडे यांचे असून मेधा मराठे यांनी संपादित केलेल्या ‘वरातीचे’ दिग्दर्शन जगदीश कुंटे यांनी केले आहे. बेळगाव व नाशिक येथील तसेच कॅलिफोर्निया मधील, मुख्यतः कुंटे आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्य या प्रयोगात सहभागी आहेत.

प्रथम भालचंद्र कुंटे हे बेळगावचे कवि अविनाश ओगले यांच्या निवडक विडंबन कविता सादर करणार आहेत. मध्यंतरानंतर ‘ वाऱ्यावरची वरात ‘ सादर होईल. प्रयोगाला मुक्त प्रवेश असून नाव नोंदणीद्वारे उस्फूर्त प्रतिसाद मिळून प्रयोग हाऊसफुल्ल झाला आहे.

The post अमेरिकेत ‘वाऱ्यावरची वरात’ appeared first on News 24 Tass Marathi.

दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावच्या तीन खेळाडूंची निवड
भूतानमध्ये दाखवणार दमदार कामगिरी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी जिल्ह्यातील तीन शरीरसौष्ठवपटूंची निवड झाली आहे. भूतानमधील थिंपू येथे ३० जून ते ४ जुलैदरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रशांत खन्नूकर, प्रताप कालकुंद्रीकर आणि महिला गटातून केतकी पाटील भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल हायलॉक ग्रुपच्या वतीने तिन्ही खेळाडूंचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी हायलॉक ग्रुपचे संचालक दिलीप चिटणीस, कर्नाटक शरीर सौष्ठव संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनाथ, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम. गंगाधर, सचिव हेमंत हावळ तसेच पदाधिकारी सुनील राऊत, सुनील पवार, अनंत लंगरकांडे, नागराज कोलकार आणि गणेश गुंडप उपस्थित होते.

बेळगावच्या तीन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेसाठी झालेली निवड ही जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी गौरवास्पद बाब मानली जात असून, त्यांच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

The post दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावच्या तीन खेळाडूंची निवड appeared first on News 24 Tass Marathi.

जकार्तात बेळगावचा डंका !
नागनूर रुद्राक्षी मठाच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय ‘रोबोटिक्स स्पर्धेत’ सुवर्णयश

बेळगाव : अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या बेळगावातील दोन विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावत जकार्ता, इंडोनेशिया येथे आयोजित ‘कोडेव्हर रोबोटिक्स स्पर्धेत’ प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘नागनूर रुद्राक्षी मठ’ आणि बेळगाव विभागासाठी अभिमानाची ठरलेली ही कामगिरी शिक्षण, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही साकार होऊ शकतात, याचा प्रेरणादायी संदेश देणारी ठरली आहे.

सुशांत लकप्पा बांदिवड्डार हा रिक्षाचालकाचा मुलगा असून विठ्ठल मल्लिकार्जुन गडग हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे. दोघेही ‘श्री सिद्धरामेश्वर शैक्षणिक संस्थेत’ शिक्षण घेत असून, शिवबसवनगर येथील ‘नागनूर रुद्राक्षी मठा’च्या आवारात कार्यरत असलेल्या ‘STEAM-H प्रशिक्षण आणि संशोधन संस्थे’शी जोडलेले आहेत.

या विद्यार्थ्यांची प्रथम निवड अत्यंत स्पर्धात्मक अशा ‘ज्युनियर सायंटिस्ट प्रोग्राम’साठी झाली होती. या कार्यक्रमांतर्गत त्यांना संशोधनाधारित प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रकल्पांवरील काम आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले. याच प्रशिक्षणामुळे त्यांच्या तांत्रिक कौशल्यांना धार मिळाली आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

मार्च महिन्यात आयोजित प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘कोडेव्हर’ स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. बंगळुरू येथील ‘गीतम विद्यापीठात’ झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या ‘रोबोट सॉकर सिस्टिम’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने परीक्षकांची मने जिंकली आणि त्यांना जकार्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळाली.

१६ व १७ मे रोजी पार पडलेल्या या जागतिक स्पर्धेत २५ हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. विविध नामांकित खासगी व आंतरराष्ट्रीय शाळांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करताना सुशांत आणि विठ्ठल यांनी आपल्या तांत्रिक कौशल्य, कल्पकता आणि सांघिक कार्याच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.

‘STEAM-H प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला’ ‘Transdisciplinary Learning Solutions Pvt. Ltd.’ या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. तसेच ‘नागनूर रुद्राक्षी मठाचे’ श्री अल्लामप्रभु स्वामीजी यांचे आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन संस्थेला लाभत आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेस सक्षम करण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे.

सुशांत आणि विठ्ठल यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण बेळगाव आणि देशासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर चमकू शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

The post जकार्तात बेळगावचा डंका ! appeared first on News 24 Tass Marathi.

आयजीपी संदीप पाटील यांचे सिडनीतील ‘आयर्न मॅन ७०.३’ स्पर्धेत यश
बेळगाव : कर्तव्यनिष्ठा आणि फिटनेसची आवड यासाठी ओळखले जाणारे आयजीपी संदीप पाटील यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पार पडलेली अत्यंत आव्हानात्मक ‘आयर्न मॅन ७०.३’ स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करत आणखी एक मानाचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. ही त्यांची सहावी ‘आयर्न मॅन ७०.३’ स्पर्धा ठरली असून त्यांच्या या यशामुळे कर्नाटक पोलीस दलाचा गौरव वाढला आहे.

गोवा, थायलंड, पोलंड, तुर्की आणि कोपनहेगननंतर आता सिडनीमध्येही त्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची छाप उमटवली. पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा अत्यंत कठीण टप्प्यांचा समावेश असलेली ही जगप्रसिद्ध स्पर्धा त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

आयजीपी संदीप पाटील यांची ही कामगिरी केवळ शारीरिक क्षमतेचे उदाहरण नसून, कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे तरुणाईसह पोलीस दलातही नवचैतन्य निर्माण झाले आहे.

The post आयजीपी संदीप पाटील यांचे सिडनीतील ‘आयर्न मॅन ७०.३’ स्पर्धेत यश appeared first on News 24 Tass Marathi.

अमण सुणगारची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बाजी
बेळगाव : बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि अष्टपैलू जलतरणपटू अमन अभिजीत सूणगार याने मलेशिया येथे झालेल्या ६८ व्या मलेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना १ रौप्य, १ कांस्यपदक संपादन करत अतुलनीय कामगिरी करत बेळगावचे नाव उज्वल केले. अमन सुणगार याने पुरुषांच्या खुल्या गटातील १०० मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेत दुसऱ्या क्रमांक सहा रौप्य पदक तर २०० मीटर्स बॅक स्ट्रोक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासह कांस्यपदक संपादन केले. अमन सुणगार याला आई वसुंधरा व वडील अभिजीत सुणगार यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

The post अमण सुणगारची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बाजी appeared first on News 24 Tass Marathi.

अमेरिकेच्या हवाई दलाचे A-10 लढाऊ विमान फारसी खाडीत कोसळले
पायलट सुरक्षित

नवी दिल्ली : अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानाचा फारसी खाडीमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त विमान फेअरचाईल्ड रिपब्लिक A-10 थंडरबोल्ट II होते, जे अमेरिकेच्या हवाई दलातील अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी एक आहे.

अमेरिकेच्या द न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, अपघातानंतर विमानाचे मोठे नुकसान झाले असून, विमान खंडित झाले आहे. मात्र पायलट सुरक्षित आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

इराणमधील माध्यमांनी दावा केला आहे की, त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे विमान टार्गेट केले होते. याआधीच F-15E लढाऊ विमानावर हल्ला झाला होता आणि त्यानंतरच A-10 विमानाचा अपघात घडल्याची माहिती आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणच्या हवाई क्षमतेवर नियंत्रण असल्याचे सांगत आहेत, तरीही अमेरिकेच्या लढाऊ विमानांना मोठे नुकसान होत आहे. या घटनांमुळे फारसी खाडीमध्ये तणाव वाढला आहे, आणि अमेरिकेच्या लढाऊ क्षमतांवर प्रश्न निर्माण झाला आहे.

The post अमेरिकेच्या हवाई दलाचे A-10 लढाऊ विमान फारसी खाडीत कोसळले appeared first on News 24 Tass Marathi.

मलेशियातील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या मल्लांचे यश
बेळगाव / प्रतिनिधी

मलेशिया येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने पार पडलेल्या इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये बेळगावच्या मल्लांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने भारतीय संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यात आली होती. कर्नाटकातून बेळगाव व हुबळी येथील मल्लांची निवड होऊन त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

या स्पर्धेत श्रेयश दशरथ हट्टीकर (अंडर -19, 65 किलो) – रौप्य पदक, सिद्धांत निकेश कडाली (अंडर -14, 62 किलो) – कांस्य पदक, शुभम मारुती हट्टीकर (सीनियर, 70 किलो) – रौप्य पदक, विक्रम मंजुनाथ चिलनंवर (अंडर -19, 60 किलो) – रौप्य पदक अशी दमदार कामगिरी करत बेळगावच्या मल्लांनी देशाचा नावलौकिक वाढवला.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पै.अतुल सुरेश शिरोले व पै.अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाचा खेळाडूंना मोठा लाभ झाला. मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष मा. अजयकुमार साळुंखे सर व उपाध्यक्ष मा. विनोद शिंदे सर यांनी सर्व मल्लांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत भारतातून एकूण ३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ६ सुवर्ण, ५ रौप्य व ७ कास्य पदकांसह भारतीय संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या यशामुळे भारतीय कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ मिळाले असून मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन कर्नाटकचे सर्वत्र कौतुक होत आहे.

The post मलेशियातील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या मल्लांचे यश appeared first on News 24 Tass Marathi.