speech Archives | News 24 Tass Marathi

कागवाड येथे निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव व शिवानंद महाविद्यालय, कागवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

कागवाड : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव तथा शिवानंद महाविद्यालय, कागवाड येथील मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर स्मृतिदिन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांमध्ये तब्बल ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली साहित्यिक व वक्तृत्व प्रतिभा सादर केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख तथा शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, प्रो. बी. डी. दामन्नावर, डॉ. आनंदकुमार जक्कन्नावर, प्रा. मनोज कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. एस. पी. तळवार म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या जिद्द, संघर्ष आणि समृद्ध जीवनानुभवाच्या बळावर मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण केले. त्यांच्या साहित्यामध्ये कष्टकरी, वंचित, शोषित आणि गावकुसाबाहेरील समाजाच्या वेदना, संघर्ष आणि वास्तव जीवनाचे प्रभावी चित्रण आढळते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि साहित्याचा अभ्यास करून सामाजिक जाण विकसित करावी.

ते पुढे म्हणाले, वाचन ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली असून समाज समजून घेण्यासाठी पुस्तकांइतका प्रभावी मित्र दुसरा नाही. पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांनी आयुष्यभर दुर्मीळ ग्रंथांचे जतन व संवर्धन करून वाचनसंस्कृतीची अमूल्य सेवा केली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि प्रभावी अभिव्यक्तीची सवय जोपासावी. अशा उदात्त हेतूने या निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानंतर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. स्पर्धकांनी विविध समकालीन आणि सामाजिक विषयांवर प्रभावी मांडणी करून परीक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या विचारांची स्पष्टता, भाषाशैली, आशयाची समृद्धता आणि प्रभावी सादरीकरण यामुळे स्पर्धांचा दर्जा उंचावला.

स्पर्धेसाठी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी आणि डॉ. अमोल पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभाग, शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

The post कागवाड येथे निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

महात्मा गांधी संस्थेच्या कथा कथन स्पर्धा उत्साहात संपन्न
कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित कथा कथन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ॲड. नामदेव मोरे होते. प्रा. पी. व्ही. नाकाडी यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य सावंतवाडीचे भरत गावडे यांच्याहस्ते रोपाला पाणी घालून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

प्रारंभी संस्थाध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भरत गावडे यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. गावागावांत साहित्य चळवळ उभी राहणे गरजेचे असून वाचन, लेखन आणि व्यासपीठावर आत्मविश्वासाने विचार मांडण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित होते, असे त्यांनी सांगितले.

प्रा. पी. व्ही. नाकाडी यांनी कथा कथन करताना विषयाची प्रभावी मांडणी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण वाचनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी विषयावर प्रभुत्व मिळवून प्रभावी अभिव्यक्ती विकसित करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात ॲड. नामदेव मोरे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

स्पर्धेच्या माध्यमिक गटात ठळकवाडी हायस्कूलच्या पुष्कर प. कोलेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्वामी विवेकानंद हायस्कूल, उचगावच्या आमना खा. सनदी यांनी द्वितीय, तर त्याच शाळेच्या नागवेणी मा. लोहार यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

प्राथमिक गटात अतिवाड प्राथमिक शाळेच्या दिव्या द. कोले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्रांजल मा. गावडे (नागनवाडी) यांनी द्वितीय, तर अनन्या ग. पाटील (तुडये) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, गौरवपत्रे आणि सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला भरत गावडे, ॲड. नामदेव मोरे, तेजस्विनी संतोष सुतार, लक्ष्मण जाधव, अक्षता र. अष्टेकर, रघुनाथ मोरे, के. जी. मेणसे, यशवंतराव मोरे, यल्लापा बुरुड, प्रणाली कणबरकर, एम. पी. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण किशोर पाटील, अशोक येटले, भरत गावडे आणि प्रा. पी. व्ही. नाकाडी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका किरण बा. जाधव यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

The post महात्मा गांधी संस्थेच्या कथा कथन स्पर्धा उत्साहात संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात सार्वजनिक वक्तृत्व कलेवरील प्रेरणादायी ओपन हाऊस कार्यक्रम
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि बेळगाव टोस्टमास्टर्स सेंटेनरी क्लबचा संयुक्त उपक्रम

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि बेळगाव टोस्टमास्टर्स सेंटेनरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलै २०२६ रोजी बेळगावात सार्वजनिक वक्तृत्व कला, प्रभावी संवादकौशल्य आणि नेतृत्व विकासावर आधारित प्रेरणादायी ओपन हाऊस कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सायंकाळी ४ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सहभागी आणि उपस्थित पाहुण्यांना सार्वजनिक वक्तृत्वाची प्रभावी शैली, आत्मविश्वासपूर्ण संवाद आणि नेतृत्वगुण विकसित करण्याविषयी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. विविध सत्रांमधून उपस्थितांना स्वतःच्या अभिव्यक्तीची ताकद ओळखण्याची आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधण्याची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन कार्यक्रम अध्यक्षा रोटेरियन दिव्या एम. यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी रोटेरियन राजनंदा गर्गी, रोटेरियन अनुपमा कळ्ळोळ, रोटेरियन रेणुका मोत्रे आणि रोटेरियन सविता वेसणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले.

आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येईल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

The post बेळगावात सार्वजनिक वक्तृत्व कलेवरील प्रेरणादायी ओपन हाऊस कार्यक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

कावळेवाडीतील वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कावळेवाडी प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.स्पर्धेचे उद्घाटन शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष ॲड. नामदेव मोरे यांच्या हस्ते झाले. निवृत्त मुख्याध्यापक अशोक येटले (वेंगुर्ले) यांनी पुष्पहार अर्पण करून फोटोपूजन केले. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला

प्रास्ताविक संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच पुस्तके वाचून विविध ज्ञान मिळते अशा स्पर्धांतून विद्यार्थी घडत असतो भविष्यात उत्कृष्ट वक्ता बनू शकतो असे विचार व्यक्त केले. ही संधी विद्यार्थ्यांनी घेऊन यशस्वीपणे स्पर्धेसाठी उदंड प्रतिसाद दिला हेच खरे यश आहे असे विचार व्यक्त केले.

विजेते स्पर्धक :

प्राथमिक गटात : प्रथम क्रमांक – कु. ईशानी पाटील, कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळा बेळगाव, द्वितीय क्रमांक – भूमी भातकांडे, बालिका आदर्श टिळकवाडी, तृतीय क्रमांक – दिव्या संजय यळ्ळूरकर, मराठी प्राथमिक शाळा बेनकनहळ्ळी.

माध्यमिक गटात : प्रथम क्रमांक – अथर्व वि. गुरव, विद्यामंदिर हाय. तडशिनहाळ, द्वितीय क्रमांक – समृद्धी पाटील बेनकनहळ्ळी हायस्कूल, तृतीय क्रमांक – कु. नागवेणी लोहार, स्वामी विवेकानंद हायस्कूल उचगाव.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह, गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अविनाश कांबळे, ॲड. नामदेव मोरे, प्रा. डाॅ. एन. डी. कार्वेकर, एम. पी. मोरे, के. आर. भास्कर, शिवाजी जाधव, सौ. आशा बाचीकर, रेणुका प. मोरे, लक्ष्मण जाधव, केदारी कणबरकर, रघुनाथ क. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

परिक्षक म्हणून बांदा महाविद्यालयचे प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, प्रा. महादेव खोत, अशोक येटले यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन भाग्यश्री कदम आभार पुंडलिक जाधव यांनी मानले. या स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post कावळेवाडीतील वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.