marathi sahitya samelan Archives | News 24 Tass Marathi

पुण्यात २८ ते ३१ जानेवारीदरम्यान शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यात होणार आहे. हे ऐतिहासिक संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात भरविण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे रविवारी महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शंभरावे संमेलन असल्याने ते भव्य, ऐतिहासिक आणि संस्मरणीय स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते.

संमेलनाच्या स्थळ आणि तारखांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व सभासदांनी एकमताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड केली. यापूर्वी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी करून विविध सुविधांचा आढावा घेतला होता.

या पाहणी दौऱ्यात अध्यक्ष योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते. त्यांनी विविध ठिकाणांच्या सुविधा, प्रांगणाचा विस्तार, वाहनतळ, निवास व्यवस्था आणि इतर आवश्यक बाबींचा अभ्यास केला.

बैठकीत उपस्थित सदस्यांनी विद्यापीठ परिसर संमेलनासाठी सर्वार्थाने योग्य असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संमेलनाच्या आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभणार असल्याची माहितीही देण्यात आली.

या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला. या बैठकीस संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

The post पुण्यात २८ ते ३१ जानेवारीदरम्यान शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन appeared first on News 24 Tass Marathi.

धाराशिवच्या संमेलनात सीमाभागाचा बुलंद हुंकार
मराठी भाषा, संस्कृती आणि सीमावासीयांच्या न्यायहक्कांचा मुद्दा केंद्रस्थानी

धाराशिव : अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे आयोजित ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. साहित्य, संस्कृती आणि मराठी अस्मितेच्या विविध पैलूंना उजाळा देणाऱ्या या संमेलनात सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांनाही प्रभावीपणे वाचा फोडण्यात आली.

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वागताध्यक्ष आमदार कैलासदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांचे दर्शन घडले. यावेळी बोलताना आमदार कैलासदादा पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या जतनासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामूहिक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सीमावासीयांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण ठामपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

संमेलनाच्या समारोप सत्रात आयोजित काव्यमैफलीने विशेष लक्ष वेधून घेतले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनातून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. काव्य हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या काव्यमैफलीत अखिल भारतीय साहित्य परिषद, कर्नाटक राज्य शाखेच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील १२ आणि बिदर जिल्ह्यातील ५ कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला. त्यांच्या कवितांमधून सीमाभागातील मराठी समाजाच्या भावना, संघर्ष, अस्मिता आणि अपेक्षा यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले.

कर्नाटक राज्याध्यक्ष तसेच सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सादर केलेल्या ‘माय’ आणि ‘लढा’ या कवितांना विशेष प्रतिसाद मिळाला. ‘माय’ या कवितेत महाराष्ट्र आणि सीमाभागातील नाते भावनिक स्वरूपात मांडण्यात आले, तर ‘लढा’ या कवितेत न्याय, स्वाभिमान आणि अस्मितेसाठी सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब उमटले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

याशिवाय किरण पाटील, रोशनी हुंद्रे, अपर्णा पाटील, संजीवनी खंडागळे, स्मिता आळतेकर, अशोक सुतार, चंद्रशेखर गायकवाड, पूजा सुतार, मनीषा नाडगौडा आणि स्नेहल बर्डे यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी विषयांवर आधारित कविता सादर केल्या.

सीमाभागातील कवी-कवयित्रींच्या सशक्त अभिव्यक्तीमुळे संमेलनात मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि न्यायाच्या लढ्याचा ठसा उमटला. साहित्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडण्याची आणि जनजागृती घडवून आणण्याची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

The post धाराशिवच्या संमेलनात सीमाभागाचा बुलंद हुंकार appeared first on News 24 Tass Marathi.

समाजात जागृतीसाठी साहित्यिकांनी सक्रिय भूमिका घ्यावी
बेळगाव साहित्य संमेलनात डॉ. यशवंत पाटणे यांचे आवाहन

बेळगाव : समाजात वाढत चाललेली धार्मिक, भाषिक आणि सामाजिक फूट लक्षात घेता साहित्यिकांनी निडरपणे वास्तव मांडत जनजागृतीचे कार्य अधिक प्रभावीपणे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. मातृभाषा ही समाजाच्या संस्कृतीशी आणि अस्मितेशी घट्ट जोडलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव जिल्हा शाखा आणि मराठा मंदिर यांच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. खानापूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे उत्साहात हा साहित्य सोहळा पार पडला.

“मातृभाषेतून घेतलेले शिक्षण माणसाला संस्कृतीची जाणीव करून देते. इतर भाषा व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या असल्या, तरी संवेदनशील साहित्यिक, कवी आणि कलाकार घडवण्यासाठी मातृभाषेचे संस्कार अत्यावश्यक असतात,” असे डॉ. पाटणे यांनी सांगितले. सध्याच्या मूल्यहरण झालेल्या राजकारणाबरोबरच वाढत्या भोगवादी प्रवृत्ती आणि समाजात पसरत असलेल्या द्वेषपूर्ण वातावरणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे साहित्यिकांनी अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी, कै. अजितदादा पवार सभागृह, कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथदालन आणि पॉलिहाइड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, कुसुमाग्रज आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले.

संमेलनाचे उद्घाटन उद्योजक आणि मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष संजय गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर एल. पी. पाटील यांनी प्रास्ताविक मांडले. यावेळी सीमाकवी रवींद्र पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, महादेव चौगुले, डी. बी. पाटील आणि रणजीत चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात “छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज” या विषयावर शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात लोककवी प्रशांत मोरे यांच्या “काळजातल्या कविता” या काव्यमैफलीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. पाटील आणि स्मिता किल्लेकर यांनी केले. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून साहित्यप्रेमी, कवी आणि लेखक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The post समाजात जागृतीसाठी साहित्यिकांनी सक्रिय भूमिका घ्यावी appeared first on News 24 Tass Marathi.

आमदार जयंत पाटील यांना ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण
“माय मराठीचा जागर हीच खरी सांस्कृतिक सेवा” ; जयंत पाटील यांचे गौरवोद्गार

बेळगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांना ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ ची निमंत्रण पत्रिका नुकतीच परिषदेच्या शिष्टमंडळातर्फे प्रदान करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जयंत पाटील यांची भेट घेऊन संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी सुरू असलेल्या परिषदेच्या कार्याची माहितीही देण्यात आली.

निमंत्रण स्वीकारताना जयंत पाटील यांनी संमेलनास शुभेच्छा देताना सांगितले की, “संमेलनाच्या माध्यमातून माय मराठीचा जागर घडविण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य जपण्यासाठी अशी चळवळ सातत्याने पुढे जाणे ही काळाची गरज आहे.”

यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील, एम. वाय. घाडी, मोहन अष्टेकर, संजय मोरे, संजय गौंडाडकर, रणजित चौगुले, मोहन पाटील व गणेश दड्डीकर तसेच महिला कार्यकारिणीतील नेत्रा मेणसे, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे, संजीवनी खंडागळे, स्मिता मेंडके, स्मिता किल्लेकर आणि गीता घाडी उपस्थित होत्या. मराठी अस्मितेचा जागर आणि साहित्यिक चळवळीला नवे बळ देणारे हे संमेलन येत्या २४ मे रोजी बेळगाव येथे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडणार असून साहित्यप्रेमींमध्ये संमेलनाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

The post आमदार जयंत पाटील यांना ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण appeared first on News 24 Tass Marathi.

उद्योजक परशराम घाडी यांच्याहस्ते होणार ‘कै. अजितदादा पवार सभागृहाचे’ उद्घाटन
बेळगाव : येत्या २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनातील ‘लोकनेते कै. अजितदादा पवार सभागृहाचे’ उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते परशराम जोगाणी घाडी यांच्याहस्ते होणार आहे.

या संमेलनाची निमंत्रण पत्रिका नुकतीच परशराम जोगाणी घाडी यांना परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारूती पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील आणि खजिनदार एम. वाय. घाडी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली.

प्रसाद होमिओपॅथी फार्मसीचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या परशराम जोगाणी घाडी यांनी एलआयसी क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, गरजूंना मदत, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योगदान आणि मराठी भाषा-संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने कार्य करणे यामुळे ते बेळगावात सुपरिचित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

निमंत्रण स्वीकारताना श्री. घाडी यांनी सीमाभागात मराठी साहित्य व संस्कृतीचा जागर कायम ठेवणाऱ्या या संमेलनाशी जोडले जाणे हा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. तसेच कै. अजितदादा पवार यांच्या नावाने उभारलेल्या सभागृहाच्या उद्घाटनाची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संमेलनाच्या तयारीची माहिती दिली. संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी केले.

The post उद्योजक परशराम घाडी यांच्याहस्ते होणार ‘कै. अजितदादा पवार सभागृहाचे’ उद्घाटन appeared first on News 24 Tass Marathi.

तीन सत्रांत रंगणार ७ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन
मराठी अस्मितेचा जागर ; व्याख्यान, काव्य मैफल आणि साहित्यिकांचा मेळावा

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन-२०२६ येत्या रविवारी दि. २४ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, मराठा मंदिर येथे पार पडणार आहे. सीमाभागातील मराठी साहित्यप्रेमींसाठी हे संमेलन यंदाही आकर्षणाचे केंद्र ठरणार असून तयारीला वेग आला आहे.

संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आणि कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी नुकतीच डी. बी. पाटील कार्यालयात महिला व पुरुष कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र मारूती पाटील होते. “हे संमेलन सीमाभागातील मराठी अस्मितेचा हुंकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने ही आपली वैयक्तिक जबाबदारी समजून काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

संमेलनातील ‘लोकनेते कै. अजितदादा पवार सभागृहाचे’ उद्घाटन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते परशराम जोगाणी घाडी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे विराजमान होणार आहेत.

दुसऱ्या सत्रात पुण्याचे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर तिसऱ्या सत्रात मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे ‘काळजातल्या कविता – आई व बाप’ या विषयावर गेय काव्य मैफल सादर करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी दिली.

बैठकीत स्वागत, प्रसिद्धी, मंडप व्यवस्था, पाहुण्यांचे आदरातिथ्य आणि भोजन व्यवस्था अशा विविध समित्यांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी डी. बी. पाटील, एम. वाय. घाडी, शिवसंत संजय मोरे, रणजीत चौगुले, एम. के. पाटील, मोहन अष्टेकर, अरुणा गोजे-पाटील, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे, स्मिता किल्लेकर आदी उपस्थित होते.

The post तीन सत्रांत रंगणार ७ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन appeared first on News 24 Tass Marathi.

सातव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव आयोजित सातवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २४ मे रोजी मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे संपन्न होत आहे. या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे शनिवार दि. १६ मे रोजी सायंकाळी संमेलनाचे उद्घाटक आणि मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी परिषदेचे राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, कार्याध्यक्ष महादेव चौगुले, उपाध्यक्ष डी‌. बी. पाटील, सचिव रणजित चौगुले, एस. वाय. घाडी, डॉक्टर संजीवनी खंडागळे, रोशनी हुंदरे, सविता वेसणे, नेत्रा मेणसे, गीता घाडी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

The post सातव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण appeared first on News 24 Tass Marathi.

सातवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २४ मे रोजी
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राज्याध्यक्ष रविंद्र पाटील यांनी दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करून यंदाचे साहित्य संमेलन विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी समृद्ध होणार असल्याचे सांगितले. उद्घाटन सत्र, संमेलनाध्यक्षांचे भाषण, प्रेरणादायी शिवव्याख्यान तसेच बहारदार काव्यमैफिल अशा तीन प्रमुख सत्रांमध्ये संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असून साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. या बैठकीस परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रविंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी, एम. के. पाटील, रणजीत चौगुले, संजय गुरव, मोहन अष्टेकर तसेच महिला जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे-पाटील, मनीषा नाडगौडा, गीता घाडी, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे, नेत्रा मेणसे, स्मिता किल्लेकर, संजीवनी खंडागळे आणि स्मिता मेंडके उपस्थित होत्या.

The post सातवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २४ मे रोजी appeared first on News 24 Tass Marathi.

प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी
प्रा. डॉ. बी. एम. हिर्डेकर अध्यक्ष

बेळगांव : प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि शिवाजी विद्यापीठातील निवृत्त परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते.

कवीवर्य नारायण सुर्वे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त त्यांचे काव्यलेखन व कार्य तसेच गेल्या अकरा वर्षांपासून राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर अनेक अंगांनी हल्ले होत असून राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यघटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी लेखकांचीही आहे. म्हणून लोकशाहीवर होणारे हल्ले व लेखकांची जबाबदारी ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. संमेलनाचे उद् घाटन प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय महासचिव व लेखक डॉ. सुखदेवसिंग सिरसा, चंदिगड यांच्या हस्ते होणार आहे.

चार सत्रात हे संमेलन होणार आहे. सकाळी दहा वाजता पहिल्या सत्रात उद् घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये उद् घाटक व अध्यक्ष यांची भाषणे होतील. साडेबारा वाजता दुसरे सत्र होईल. त्यामध्ये अन्नपूर्णा महिला मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न कॉम्रेड अरुणा असफ आली पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार मुंबईतील सफाई कामगारांचे नेते कॉ. दीपक भालेराव यांना अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत भोजन होईल. त्यानंतरच्या तिसऱ्या सत्रात विशेष व्याख्यान होईल. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांचे नारायण सुर्वे यांचे काव्यविश्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे राहाणार आहेत.

चौथ्या सत्रात सायंकाळी पाच वाजता प्रगतिशील लेखक संघाच्या सदस्यांकडून नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन होणार आहे. संकल्पना व संहिता लेखन कॉ. अनिल आजगावकर यांचे आहे. या कार्यक्रमात प्रा. अशोक अलगोंडी, निला आपटे, मधु पाटील व रोशनी हुंद्रे यांचा सहभाग राहाणार आहे.

अध्यक्षीय समारोपानंतर संमेलनाची सांगता होणार आहे. कवीवर्य पद्मश्री कॉ. नारायण सुर्वे साहित्यनगरी, श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल प्रांगण) रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ, खानापूर रोड, बेळगांव येथे हे संमेलन होणार आहे. बैठकीस पदाधिकारी व बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

The post प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगुंदी येथे उद्या २० वे मराठी साहित्य संमेलन
बेळगुंदी ता. ३१ : बेळगुंदी येथे उद्या रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी, २० वे मराठी साहित्य संमेलन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज साहित्यनगरी मरगाई देवस्थान परिसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी, अनुवादकार, समीक्षक, साहित्यिक, पुणे या असणार आहेत. संमेलन चार सत्रात सकाळी ७.३० ते रात्री ६ वा.पर्यंत होणार आहे.

संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, संमेलनाचे उद्घाटन माननीय श्री. मोहन यल्लाप्पा मोरे माजी अध्यक्ष आरोग्य शिक्षण व स्थायी समिती जि. पं. बेळगाव यांच्याहस्ते होणार आहे, त्यानंतर स्वागताध्यक्ष माननीय डॉ. अरुण मारुती जाधव – प्राचार्य, आधार एज्युकेशन सोसायटी, बेळगांव उपस्थितांचे स्वागत करणार आहेत. पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे.

दुसऱ्या सत्रात प्रा. वैजनाथ महाजन, जेष्ठ समिक्षक सांगली यांच्या अध्यक्षतेखाली ‘वाचू आनंदे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये मा. श्री. चिंतामणी सहस्त्रबुद्धे, न्यूज ब्युरोचीप, सांगली, मा. शेखर जोशी, सहयोगी संपादक दै. सकाळ सांगली, मा. प्रा. संजय ठिगळे, माजी सदस्य मराठी विश्वकोश मंडळ, सांगली यांचा सहभाग असणार आहे.

दुपारी १.३० ते २.३० पर्यंत स्नेहभोजन होणार आहे. तिसऱ्या सत्रात मालगांव मिरज, येथील जि. पं. शाळेचे मुख्याध्यापक कवी श्री. गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. यामध्ये कवी श्री. मुबारक उमराणी, कवी सेंट ऑगस्टीन हायस्कूल, नेरुळ, नवी मुंबई व स्थानिक निवडक नवोदित कवी सहभागी होणार आहेत.

चौथ्या सत्रात कथाकथनकार श्री. शरद जाधव, धनगांव, पलुस – सांगली यांचे कथाकथन होणार आहे. यानंतर बेळगुंदी पंचक्रोशीतील सन २०२४ – २५ साली इयत्ता १० मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

संमेलन नगरीला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे, तर प्रवेशद्वाराला श्री रवळनाथ प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे.

संमेलनाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी, ग्रामस्थ पंच कमिटी, ग्रामपंचायत, महिला मंडळे, आमदार आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा, बालवीर विद्यानिकेतन, सेंट पॉल्स हायस्कूल, बेळगुंदी हायस्कूल बेळगुंदी, कन्या विद्यालय बेळगुंदी शिक्षकवृंद, विद्यार्थी – विद्यार्थीनी, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, सेवाभावी संस्था, सर्व प्रसारमाध्यमे, हितचिंतक बेळगुंदी, ता. बेळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

The post बेळगुंदी येथे उद्या २० वे मराठी साहित्य संमेलन appeared first on News 24 Tass Marathi.