zilla panchayat Archives | News 24 Tass Marathi

शाळा आणि अंगणवाड्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमधील सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षेची तातडीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी दिले.

मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. येत्या दोन दिवसांत शाळा व अंगणवाड्या सुरू होणार असल्याने परिसरातील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा, अन्न साठवण कक्ष स्वच्छ ठेवावेत तसेच अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले. याशिवाय पिण्याचे पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.

पावसाळ्यापूर्वी शाळा आणि अंगणवाडी इमारतींची तपासणी करून धोकादायक किंवा कमकुवत झालेल्या इमारतींमधील वर्ग तात्पुरत्या इतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावेत, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले.

शाळा आणि अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची एफटीके किटद्वारे तपासणी करण्यासोबतच परिसरातील धोकादायक वीजतारा आणि विद्युत उपकरणे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असेही सांगण्यात आले.

१ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी अंगणवाड्यांमध्ये आणि चौथ्या शनिवारी शाळांमध्ये पालक सभा घेण्याचे निर्देश देण्यात आले. वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

या बैठकीस जिल्हा पंचायत नियोजन संचालक रवी बंगारप्पन्नावर, बसवराज अडवीमठ, मल्लिकार्जुन कलादगी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

The post शाळा आणि अंगणवाड्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या appeared first on News 24 Tass Marathi.

ह्यूम पार्क येथे ‘आंबा महोत्सवाला’ प्रारंभ
शेतकऱ्यांकडून थेट सेंद्रिय आंबा खरेदीची सुविधा

२४ स्टॉल्सवर विविध जातींच्या आंब्यांची विक्री

बेळगाव : शहरात आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय आंबा महोत्सवात विविध जातींच्या सेंद्रिय आंब्यांची रेलचेल पाहायला मिळत असून, ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून आंबा खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि फलोत्पादन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्लब रोडवरील ह्यूम पार्क येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा हमी योजना समितीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, आयजीपी चेतन सिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

मेळाव्यात बेळगाव, धारवाड, देवगड आणि कोल्हापूर येथील आंबा उत्पादकांनी २४ स्टॉल्स उभारले असून, विविध प्रकारचे सेंद्रिय आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ग्राहकांना थेट उत्पादकांकडून आंबे खरेदी करता येत असल्याने या उपक्रमाचे विशेष स्वागत होत आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांना नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला भेट देऊन स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. मागणी वाढल्यास मेळाव्याचा कालावधी वाढवण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संतीबस्तवाड येथील आंबा उत्पादक राईफ बागवान यांनी आपल्या बागेतील विविध प्रकारच्या आंब्यांची माहिती देत हे आंबे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवले जात असल्याचे सांगितले. ३५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत विविध दरांमध्ये आंब्यांची विक्री सुरू आहे.

खानापूर तालुक्यातील उत्पादक राजेश सावलेकर यांनी विशेष पद्धतीने आंब्यांचे संवर्धन आणि पिकवणी केली जात असल्याचे सांगितले. या आंब्यांना देशासह परदेशातूनही मागणी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. मेळाव्यात ग्राहकांनी विविध प्रकारच्या आंब्यांची खरेदी करत उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

The post ह्यूम पार्क येथे ‘आंबा महोत्सवाला’ प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

पाण्याचा योग्य वापर आणि बचतीबाबत जनजागृती करा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना

बेळगाव : जिल्ह्यातील कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आणि समन्वयाने कारवाई करावी. ज्या गावांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्याठिकाणी दररोज किंवा एक दिवसा आड टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. तसेच नागरिकांमध्ये पाण्याचा योग्य वापर व बचत याबाबत जनजागृती करावी अशी सूचना जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी दिली आहे.

मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी चारा व पाणीपुरवठा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिंदे म्हणाले, मे महिन्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावात किमान तीन खाजगी कुपनलिकांची ओळख करून ठेवावी. आवश्यकतेनुसार संबंधित मालकांची संपर्क साधून तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. जनावरांना चारा आणि पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आगाऊ उपाययोजना कराव्यात. गावांमध्ये जनावरांसाठी पाण्याची टाकी किंवा कुंड बांधण्यावर भर द्यावा असे निर्देशही त्यांनी दिले.

The post पाण्याचा योग्य वापर आणि बचतीबाबत जनजागृती करा appeared first on News 24 Tass Marathi.

जि. पं. सीईओंकडून हालभावी परिसरात घनकचरा व्यवस्थापन राबवण्याचे निर्देश
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील हालभावी येथील आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) प्रशिक्षण केंद्राला भेडसावणाऱ्या नागरी समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. वंटमुरी ग्रामपंचायत तसेच संबंधित शासकीय विभागांनी केंद्राला आवश्यक ते सर्व सहकार्य तातडीने द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले.

आयटीबीपी प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या विविध विभागांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. हालभावी परिसरात सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याची कामे गतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. कोणत्याही परिस्थितीत प्रशिक्षण केंद्राला पाणीटंचाई भासू नये, याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

बैठकीत आयटीबीपीचे डेप्युटी जनरल ब्रिगेडियर संदीप झुंझा यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. दरवर्षी फेब्रुवारी ते जून या कालावधीत केंद्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने या काळात नियमित पाणीपुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याची गंभीर दखल घेत राहुल शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

आयटीबीपी केंद्र हे राष्ट्रीय महत्त्वाचे असल्याने परिसर स्वच्छ व सुरक्षित राखणे ही वंटमुरी ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. दररोज कचरा संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हालभावी परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवावे, असे आदेश त्यांनी दिले.

याच बैठकीत केंद्र परिसरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरही चर्चा झाली. प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. बैठकीस आयटीबीपीचे कमांडंट सिद्धिक पी. पी., प्रकल्प संचालक रवी बंगारेप्पनवर, उपसचिव बसवराज अडविमठ यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post जि. पं. सीईओंकडून हालभावी परिसरात घनकचरा व्यवस्थापन राबवण्याचे निर्देश appeared first on News 24 Tass Marathi.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न दिल्याबद्दल जि. पं. सीईओंची सरकारी गाडी जप्त
बेळगाव / प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीची नुकसानभरपाई वेळेत न दिल्याबद्दल बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यावर न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे. न्यायालयीन आदेशानुसार गुरुवारी त्यांच्या वापरातील सरकारी वाहन जप्त करण्यात आले. शेतकऱ्यांना देय असलेली ९० लाख रुपयांपेक्षा अधिक भरपाई अद्याप अदा न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

बैलहोंगल तालुक्यातील कुलावल्ली गावातील शेतकऱ्यांची सुमारे २१ एकर जमीन शासकीय कारणांसाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीवर कात्रीदंडी येथे विविध सरकारी कार्यालये व पशुसंवर्धन विभागाच्या इमारती उभारण्यात आल्या असून अनेक वर्षांपूर्वीच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनाच अपेक्षित भरपाई मिळालेली नाही.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर बैलहोंगल न्यायालयाने प्रति एकर ४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तरीही दीर्घकाळ लोटूनही आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयाने जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश दिले. सरकारी वकील मीसाळे यांनी आदेश न पाळल्यास सीईओंची गाडी, कार्यालयीन संगणक व इतर साहित्य जप्त केले जाईल, असे स्पष्ट केले होते.

पीडित शेतकरी महेंद्र रावसाहेब देसाई यांनी सांगितले की, १९८९ मध्ये दिलेल्या जमिनीपैकी ५ एकर जमिनीची भरपाई देण्याचे स्पष्ट आदेश असूनही रक्कम मिळालेली नाही. या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत पुढील कायदेशीर लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

The post शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न दिल्याबद्दल जि. पं. सीईओंची सरकारी गाडी जप्त appeared first on News 24 Tass Marathi.

जिल्हा प्रशासनामार्फत उद्या संविधान दिनाचे आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता संविधान दिन २०२५ उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती दलित नेते मल्लेश चौगुले यांनी आज दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चौगुले म्हणाले की, विविध दलित संघटनांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही संविधान अर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून निघणारा संविधान जथ्था चन्नम्मा चौक मार्गे डॉ. आंबेडकर उद्यानात पोहोचेल. सकाळी ११ वाजता या जथ्थ्याचा जाहीर कार्यक्रमात रुपांतर होईल.

या कार्यक्रमाला प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम.  बेळगाव उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, तसेच महापालिका आयुक्त शुभा बी. आणि समाज कल्याण विभागाचे उपसंचालक रामनगौडा कन्नोळी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून चिक्कोडीचे निवृत्त शिक्षक बी.एस. नाडकर्णी उपस्थित राहतील. शहरातील सर्व नागरिकांनी तसेच दलित बांधवांनी मोठ्या संख्येने संविधान जथ्थ्यात व जाहीर कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मल्लेश चौगुले यांनी केले. कार्यक्रमावेळी दलित संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

The post जिल्हा प्रशासनामार्फत उद्या संविधान दिनाचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

स्वीप उपक्रमांद्वारे मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करा !
राज्य स्वीप नोडल अधिकारी पी. एस. वस्त्रद

बेळगाव / प्रतिनिधी

मतदार यादीच्या विशेष पुनरावृत्ती दरम्यान स्वीप उपक्रमांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे राज्य स्वीप नोडल अधिकारी पी. एस. वस्त्रद यांनी सांगितले.

सोमवारी (२७ ऑक्टोबर) जिल्हा पंचायत कार्यालयात एसआयआर/एसएसआर तयारी, स्वीप आणि निवडणुकीविषयक आयोजित विशेष व्यापक पुनरावृत्ती बैठकीत ते बोलत होते.

बैठकीदरम्यान वस्त्रद यांनी अधिकाऱ्यांना मतदार यादी पुनरावृत्तीचे उद्दिष्ट आणि प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच प्रत्येक टप्प्यावर जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी बॅनर,पत्रके,जनजागृती कार्यक्रम आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले.

जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी राज्य नोडल अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील स्वीप उपक्रम आणि निवडणुक केंद्र असलेल्या शाळा व महाविद्यालयांची माहिती सादर केली.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, ग्रा. पं. प्रकल्प संचालक रवी एन. बांगरेप्पनवर, महापालिका उपायुक्त रेश्मा तालिकोटी व उदयकुमार बी. टी., डीडीपीयू एम. एम. कांबळे, जिल्हा पीयू नोडल अधिकारी एम. ए. मुल्ला, डीडीपीआय लीलावती हिरेमठ, डीएचओ डॉ. आय. पी. गडाद तसेच इतर जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.

The post स्वीप उपक्रमांद्वारे मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करा ! appeared first on News 24 Tass Marathi.

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी योजना राबवा ; विपुल बन्सल
विविध विभागांची जिल्हास्तरीय प्रगती आढावा बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यात यावर्षी एसएसएलसी परीक्षेचा निकाल सरासरी आहे. तेव्हा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, जीर्ण शाळांच्या खोल्यांमध्ये वर्ग घेण्याऐवजी, पर्यायी इमारतींची व्यवस्था करावी आणि मुलांच्या उपस्थितीकडेही लक्ष द्यावे, असे वाणिज्य कर आयुक्त आणि जिल्हा प्रभारी सचिव विपुल बन्सल यांनी सांगितले.

शुक्रवारी (१ ऑगस्ट) जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या विविध विभागांच्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अनुदानित शाळांमध्येही परीक्षेचा निकाल खराब लागला असून निकाल सुधारण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलावीत, अशी सूचना त्यांनी केली.

यावर्षी जिल्ह्यात पाऊस चांगला आहे आणि आवश्यक पेरणी बियाणे आणि खतांची कमतरता भासू नये यासाठी शेतकऱ्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. पावसाळा सुरू होताच, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार पेरणी बियाणे पुरवले जावे. ते म्हणाले की, जर निकृष्ट दर्जाच्या पेरणीच्या बियाण्यांच्या पुरवठ्याबद्दल तक्रारी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणालेशहरात उड्डाणपूल बांधण्यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे.जिल्ह्यात पाऊस चांगला झाला आहे आणि बियाणे आणि खतांचा तुटवडा नाही. जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पावसाच्या नुकसानीचा अहवाल मिळताच, लाभार्थ्यांना तात्काळ पैसे दिले जात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण वाढलेले नाही, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी दिली.

शेतकऱ्यांना बागायती पिकांसाठी विमा भरण्यास आधीच कळविण्यात आले आहे. जर अशा दुकानांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे विकले तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, असे फलोत्पादन विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोड यांनी म्हणाले.

शिक्षण विभागाच्या उपसंचालक लीलावती हिरेमठ म्हणाल्या की, मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत वाढ करण्यासाठी शिक्षण विभाग यावर्षी विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित करत आहे.

जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी अभिनव जैन, महानगरपालिका आयुक्त शुभा बी, बेळगाव उपविभागीय अधिकारी श्रावण नायक, जिल्हा पंचायतचे उपसचिव बसवराज हेगनायक, समाज कल्याण विभागाचे सहसंचालक रामनगर गौडा कन्नोली, अन्न विभागाचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक आणि इतर बैठकीला उपस्थित होते.

The post शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी योजना राबवा ; विपुल बन्सल appeared first on News 24 Tass Marathi.