Hukkeri Archives | News 24 Tass Marathi

हिडकल जलाशयग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा
प्रलंबित नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंचन महामंडळावर दिरंगाई आणि लाचेच्या मागणीचे गंभीर आरोप

विशेष बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

बेळगाव : हिडकल जलाशयासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित नुकसानभरपाईच्या प्रश्नावरून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. शेकडो जलाशयग्रस्त शेतकरी आपल्या जनावरांसह राणी चन्नम्मा सर्कल येथे रस्त्यावर उतरले. सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी काही काळ रस्ता रोको केला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नुकसानभरपाईची प्रक्रिया जाणीवपूर्वक रखडवली जात असून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर केला.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ शेतकरी नेते बालेश मावनूर यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या प्रकरणी अनेक बैठका घेऊन अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र, काही अधिकारी मंत्र्यांनाही चुकीची माहिती देत असल्याने शेकडो एकर जमिनीची नुकसानभरपाई अद्याप रखडली आहे.

सरकार किंवा महसूल विभागाविरोधात आमचा संघर्ष नसून सिंचन महामंडळातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात लढा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसएलओ कार्यालयात आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असतानाही चुकीचे अहवाल तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

दरम्यान, आंदोलकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सिंचन महामंडळाच्या उत्तर विभागाच्या मुख्य अभियंत्यांसोबत विशेष बैठक घेण्याची घोषणा केली. या बैठकीसाठी आंदोलनकर्त्यांच्या चार ते पाच प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत अधिकाऱ्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. आवश्यक वाटल्यास राज्य सरकारकडे स्वतंत्र अहवालही पाठविला जाईल. वस्तुस्थितीची सखोल छाननी करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलकांना दिले.

The post हिडकल जलाशयग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा appeared first on News 24 Tass Marathi.

हुणसीकोळ मठाच्या स्वामीजींवर हल्ल्याचा प्रयत्न
८ जणांवर गुन्हा दाखल ; मठाच्या गेटवरून वाद वाढला

हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी गावातील हुणसीकोळ मठाचे श्री सिद्धबसव स्वामीजी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मठाच्या शेजारी राहणाऱ्या मेदार कुटुंबाने मठाच्या आवारात कार पार्क केली होती. रात्री कार बाहेर काढताना मठाचे प्रवेशद्वार उघडण्याच्या कारणावरून मठातील कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला.

वाद वाढल्यानंतर श्री सिद्धबसव स्वामीजी घटनास्थळी आले असता त्यांच्याशीही हुज्जत घालण्यात आली आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी आनंद मेदार, रत्ना मेदार, मंजुनाथ, प्रवीण मेदार यांच्यासह अन्य चार जणांविरुद्ध यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

The post हुणसीकोळ मठाच्या स्वामीजींवर हल्ल्याचा प्रयत्न appeared first on News 24 Tass Marathi.

विम्याच्या रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या
पत्नी , प्रियकरासह नऊ जण अटकेत

बेळगाव : जिल्ह्यात विम्याच्या रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माजी सैनिकाचा पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराने विषप्रयोग करून खून केल्याचा आरोप असून, या प्रकरणात पुरावे दडपण्याचा प्रयत्न झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार, निवृत्त सैनिक संदीप मंजरगी (वय ४६) हे किरकोळ रस्ता अपघातात जखमी झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. पुढील उपचारांसाठी त्यांना घटप्रभा येथील एका रुग्णालयात हलविण्यात आले होते.

तपासादरम्यान, संदीप मंजरगी यांची पत्नी सुमा आणि तिचा कथित प्रियकर पुंडलिक यांनी संगनमत करून त्यांना झोपेच्या गोळ्या देत सलाईनद्वारे विषप्रयोग केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेनंतर मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

पोलीस तपासात शवविच्छेदन आणि रासायनिक विश्लेषणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात काही व्यक्तींनी आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून पुरावे दडपण्यास मदत केल्याचा आरोप असून, त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी सुमा, पुंडलिक यांच्यासह अप्पासाहेब नाईकवाडी, चन्नप्पा अडविस्वामी मठ, नागराजू, अशोक गुजनाल, बसवराज बसम्मा आणि राहुल जोगी यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, प्रकरणातील इतर पैलूंचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, विम्याच्या रकमेच्या वाटपावरून आरोपींमध्ये झालेल्या वादातून या गुन्ह्याची माहिती समोर आल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या यमकनमर्डी आणि घटप्रभा पोलीस पथकाच्या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.

The post विम्याच्या रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या appeared first on News 24 Tass Marathi.

माजी सैनिक हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
तपास भरकटवणारा पोलीस कर्मचारीच मुख्य सूत्रधार

हुक्केरी : तालुक्यातील घोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मांजरी यांच्या मृत्यूप्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पुरावे दडपण्याचा किंवा तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याच्या संशयावरून बेळगाव पोलीस आयुक्तालयातील एका कर्मचाऱ्याच्या भूमिकेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, मृत्यूमागील कारणांचा आणि त्यासंबंधित सर्व घटनाक्रमाचा सखोल तपास केला जात आहे. तपासादरम्यान काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुन्ह्याशी संबंधित काही पुरावे नष्ट करण्याचा अथवा तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संभाव्य सहभागाचीही चौकशी केली जात असून, त्याने आपल्या पदाचा गैरवापर केला का याची पडताळणी सुरू आहे.

या प्रकरणाशी संबंधित न्यायवैद्यक अहवाल, तांत्रिक पुरावे आणि अन्य कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील सत्य परिस्थिती लवकरात लवकर समोर यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुढील तपासानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

The post माजी सैनिक हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा appeared first on News 24 Tass Marathi.

हुक्केरी तालुक्यातील माजी सैनिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले
पत्नीने प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याचा आरोप

दोन कोटींच्या विम्यासाठी कट ; तीन महिन्यांनंतर मृतदेह बाहेर काढला

बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील गोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या मृत्यूमागील धक्कादायक माहिती तीन महिन्यांनंतर समोर आली असून, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याचा संशय पोलिस तपासातून पुढे आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप मंजरगी हे अपघातात जखमी झाल्यानंतर घटप्रभा येथील रुग्णालयात उपचार घेत होते. याच काळात पत्नी सुमा हिने तिच्या प्रियकर पुंडलिकच्या मदतीने सलाईनमध्ये कीटकनाशक मिसळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. अनैतिक संबंध लपविणे आणि सुमारे दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेवर डोळा ठेवून हा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकरण संशयास्पद वाटू लागल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक यांच्या उपस्थितीत तीन महिन्यांपूर्वी पुरण्यात आलेला संदीप मंजरगी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे श्रवणकुमार नायक यांनी सांगितले.

सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगितले जात आहे. मृत संदीप यांचे बंधू संजय मंजरगी यांनी पोलिसांच्या तपासाचे कौतुक करत, देशसेवा केलेल्या सैनिकाचा विश्वासघात करून हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post हुक्केरी तालुक्यातील माजी सैनिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले appeared first on News 24 Tass Marathi.

हुक्केरीत अवैध मांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस
श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांकडून वाहन अडवून पोलिसांच्या ताब्यात

हुक्केरी : तालुक्यात अवैधपणे मांस वाहतूक करणारे वाहन श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अवैध मांस वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर श्रीराम सेनेचे कार्यकर्ते हुक्केरी परिसरात लक्ष ठेवून होते. दरम्यान, संशयास्पद हालचाल करणारे ‘टाटा एस इंट्रा’ वाहन (क्रमांक KA-22-AB-0409) दिसून आले. कार्यकर्त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून ते अडवले. तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचा दावा करण्यात आला.

घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वाहनासह संबंधित मांस जप्त केले.

यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या कथित गोहत्या आणि अवैध मांस तस्करीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. संबंधितांवर कायद्यानुसार कठोर पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.या प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

The post हुक्केरीत अवैध मांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस appeared first on News 24 Tass Marathi.

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांसह पाच जणांना हुक्केरी पोलिसांकडून अटक
१५.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत आंतरराज्य दुचाकी चोरट्यांच्या टोळीसह पाच जणांना अटक केली असून, एकूण १५.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. के. रामराजन आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रामगोंडा बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे निरीक्षक महंतेश बसापुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईत आंतरराज्यीय दुचाकी चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या उमेश हनुमंत गाडीवड्डर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मिरज, बेळगाव, गोकाक यांसारख्या विविध ठिकाणांहून चोरलेल्या ६ लाख रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

तसेच महाराष्ट्रातील रहिवासी दीपक मछिंद्र जाधव याला अटक करून त्याच्याकडून ४.५० लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या साखळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ट्रॅक्टर-ट्रेलर चोरी प्रकरणात होनगा येथील अर्जुन बसवंत शेंद्री याला अटक करण्यात आली असून, बसमधील प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या निपाणी येथील आरती लोंडा व पूजा चौगुले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याशिवाय कोटबागी येथील मुथप्पा कामाशेट्टी यांच्याकडून ५०,००० रुपये किमतीच्या बकऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी एकूण १५ गुन्ह्यांचा छडा लावून १५.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

The post आंतरराज्य दुचाकी चोरट्यांसह पाच जणांना हुक्केरी पोलिसांकडून अटक appeared first on News 24 Tass Marathi.

सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार – सतीश जारकीहोळी
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम

हुक्केरी : राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम देत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच आपला पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे स्पष्ट विधान केले आहे.

हुक्केरी येथे बोलताना सतीश जारकीहोळी यांनी राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली. भाजप नेते रमेश कत्ती यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “हायकमांडच्या निर्णयानुसार सिद्धरामय्या हेच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहतील, यात कोणतीही शंका नाही.”

राज्यात सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या चर्चा निराधार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारचे संपूर्ण लक्ष विकासकामांवर आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर केंद्रित असल्याचे ते म्हणाले.

विरोधक राजकीय हेतूने अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत, मात्र सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

The post सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार – सतीश जारकीहोळी appeared first on News 24 Tass Marathi.

हिडकल जलाशयात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
तिघे सुखरूप बचावले

हुक्केरी / वार्ताहर

शाळांच्या उन्हाळी सुट्टीत हिडकल जलाशयाच्या खाडीत पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोघांचा सोमवारी दुपारी हुक्केरी तालुक्यातील हालेगुडनट्टीजवळ बुडून मृत्यू झाला. घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

कृष्णा विठ्ठल खानापुरे (वय १४) आणि प्रज्वल गोकरा (वय १४) दोघेही (रा.दादाबनट्टी येथील आरसी सेंटर) अशी मृत मुलांची नावे आहेत.सुट्टीत आरसी सेंटर गावातील पाच मुले हाळे गुडनट्टी गावातील मंदिराजवळील हिडकल जलाशयाच्या खाडीत पोहायला गेली होती. त्या पाचपैकी तिघे सुखरूप बचावले गेले, तर कृष्णा आणि प्रज्वल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि बुडून मृत्यू पावले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

The post हिडकल जलाशयात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावणाऱ्या उपनिबंधकासह टोळीवर कारवाई
बनावट ओळखपत्रे, संगणकीय साहित्य जप्त

हुक्केरी / वार्ताहर

कुरणी परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात हुक्केरीचे उपनिबंधक आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. छाप्यात मोठ्या प्रमाणात बनावट दस्तऐवज आणि साहित्य जप्त करण्यात आले.

शिवानंद मारुती कुद्दुरी (रा. कुरणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांच्या आणि नातेवाईकांच्या नावावरील जमीन बळकावण्यासाठी बनावट करारपत्रे तयार करण्यात आली. गट क्रमांक १८९/४, १८३/३०ब आणि १८३/१३९ या जमिनींसंदर्भात खोटे फोटो व सह्यांचा वापर करून दस्तऐवज तयार केल्याचा आरोप आहे. या गैरप्रकारासाठी उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी नीलकंठ मुदपाकी यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ९ बनावट आधारकार्ड, ३ पॅनकार्ड आणि बनावट मतदार ओळखपत्रे मिळून एकूण १३ खोटी कागदपत्रे हस्तगत केली. तसेच अशोक सूर्यवंशी यांच्या फोटो स्टुडिओतून संगणक, लॅपटॉप, कॅमेरा आणि प्रिंटर यांसारखे साहित्य जप्त करण्यात आले, जे बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी हुक्केरीचे उपनिबंधक मडीवाळय्या बानीमठ आणि आनंद दड्डीमणी यांनी अटकपूर्व जामीन घेत पोलिस ठाण्यात हजेरी लावली आहे. नीलकंठ मुदपाकी, विजय मठद आणि अशोक सूर्यवंशी या तिघांना अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली असून पुढील तपास सुरू आहे.

The post बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावणाऱ्या उपनिबंधकासह टोळीवर कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.