Bailhongal Archives | News 24 Tass Marathi

बैलहोंगल तालुक्यातील हन्निकेरी यात्रेत पूर्व वैमनस्यातून संगनगौडा पाटील यांची हत्या
आठ आरोपींना अटक ; गावात तणाव

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील हन्निकेरी गावात पारंपरिक यात्रेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. गावातील जुने राजकीय वैमनस्य या घटनामागील मुख्य कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात्रेदरम्यान गावातील रहिवासी संगनगौडा पाटील, (वय ५० वर्ष) आपल्या विरोधकांच्या घरासमोर नाचत होते, तेव्हाच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला केला.

याबाबत घटना स्थळावरून प्राप्त माहितीनुसार, यात्रेची मिरवणूक सुरू असताना संगनगौडा पाटील त्यांच्या विरोधकांच्या घरासमोर नाचत होते. यावरून आरोपी गटाने त्यांना “आमच्या घरासमोर नाचू नका, पुढे व्हा” असे सांगितले. या छोट्याशा वादाचा परिणाम आरोपींचा गट अचानक हल्ला करण्यास उतरला आणि कोयते, कुऱ्हाडी, साखळ्या, काठ्या आणि उसाच्या काठ्या यांसारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करून संगनगौडा यांच्यावर निर्घृण हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात अडकलेल्या संगनगौडा यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हन्निकेरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेच्या त्वरित पाठपुराव्यानंतर पोलीसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे अशी आहेत: देमप्पा बालगन्नवर, मंजुनाथ बालगन्नवर, रुद्रप्पा बालगन्नवर, विजया बालगन्नवर, सुरप्पा बालगन्नवर, सिद्धप्पा सिंगडी, नागराज बालगन्नवर आणि बसवंतप्पा बालगन्नवर.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जुने वैर या घटनेचे मूळ कारण आहे आणि गावात शांतता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

The post बैलहोंगल तालुक्यातील हन्निकेरी यात्रेत पूर्व वैमनस्यातून संगनगौडा पाटील यांची हत्या appeared first on News 24 Tass Marathi.

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची दगडाने ठेचून हत्या
आरोपी पतीला अटक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील गोवनकोप्प येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणाचा तपास करताना जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, गोवनकोप्प येथील रहिवासी बसवराज गिरेप्पा जोडाळ्ळी याने पत्नी शिवक्का हिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या दांपत्याचा प्रेमविवाह झाला असून त्यांना तीन मुले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून शिवक्का दोन मुलांसह माहेरी राहत होती. आरोपीने तिला यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार दोडवाड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.

शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी माहेरी जाऊन शिवक्काला शिवीगाळ करत घराबाहेर ओढून आणले. त्यानंतर भररस्त्यात तिच्यावर हल्ला करून मोठा दगड डोक्यावर व पायावर मारत तिची जागीच हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

घटनेनंतर दोडवाड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पथकाचे कौतुक होत आहे.

The post चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची दगडाने ठेचून हत्या appeared first on News 24 Tass Marathi.

दोडवाड खूनप्रकरणाचा २४ तासांत उलगडा
रस्त्याच्या किरकोळ वादातून नातेवाईकाची हत्या ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बैलहोंगल / वार्ताहर

बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड येथे घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या एका दिवसात यश मिळाले आहे. घरासमोरील रस्त्याच्या वापरावरून निर्माण झालेल्या किरकोळ वादातूनच नातेवाईकाची हत्या करून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली.

कोप्प अगसी परिसरात राहणारे महेश बसय्या उपनिमठ यांचा १७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास खून करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी रुद्रय्या बसय्या उपनिमठ (वय ३६) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत महेश यांच्यात काही दिवसांपासून रस्त्याच्या वापरावरून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी चिकन सेंटरजवळ दोघांमध्ये पुन्हा वादावादी झाली. त्या वेळी महेश यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने त्याचा राग मनात ठेवत नंतर संधी साधून कोयत्याने हल्ला करून त्यांचा जीव घेतला.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय शिवानंद गुडगनट्टी आणि पीएसआय एच. के. पाटील यांच्या पथकाने जलद हालचाली करत १८ मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.

न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या वेगवान कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

The post दोडवाड खूनप्रकरणाचा २४ तासांत उलगडा appeared first on News 24 Tass Marathi.

तीव्र उन्हामुळे बैलहोंगल तालुक्यातील तलाव कोरडा
पाण्याअभावी हजारो माशांचा मृत्यू

बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटत असून बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी येथील तलाव कोरडा पडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने घटल्याने ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाला. तलावाच्या काठावर पडलेल्या माशांच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक मत्स्यपालक शंकरगौडा पाटील यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून या तलावात मासेमारीचा व्यवसाय सुरू ठेवला होता. यंदा त्यांनी तलावात सुमारे ५० हजारांहून अधिक मासे सोडून लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, तीव्र उन्हामुळे तलावातील पाणी पूर्णपणे आटल्याने माशांना हालचाल करण्यास जागा उरली नाही आणि ऑक्सिजनअभावी ते गुदमरून मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

या घटनेमुळे मत्स्यपालकाला मोठा आर्थिक फटका बसला असून गुंतवलेले भांडवलही परत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शंकरगौडा पाटील यांनी शासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जलस्रोत आटत असून जैवविविधतेवरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

The post तीव्र उन्हामुळे बैलहोंगल तालुक्यातील तलाव कोरडा appeared first on News 24 Tass Marathi.

बैलहोंगलमध्ये ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या इमारतीची पायाभरणी
जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा सरकारचा निर्धार : मंत्री दिनेश गुंडुराव

बैलहोंगल : राज्यातील उत्तम व्यवस्थापन असलेल्या रुग्णालयांमध्ये बैलहोंगल तालुका रुग्णालय अग्रस्थानी असून, अशाच पद्धतीने प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयांचे व्यवस्थापन झाले तर रुग्णांच्या बहुतेक समस्या सुटतील, असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी केले. स्थानिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ५० खाटांच्या नव्या अतिदक्षता विभागास (सीसीयू) मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने बैलहोंगल तालुका सार्वजनिक रुग्णालय परिसरात ५० खाटांच्या क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी सोमवारी करण्यात आली. त्यावेळी मंत्री बोलत होते.

गरीबी निर्मूलन व सामाजिक न्याय साध्य करण्यासाठी हमी योजनांद्वारे राज्याला आदर्श बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या विविध कामांसाठी बेळगाव जिल्ह्याला सुमारे ३०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. बैलहोंगल तालुक्यात दरमहा सुमारे २०० प्रसूती होत असल्याने ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाची गरज प्रकर्षाने जाणवत होती, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यात पाच हमी योजनांची अंमलबजावणी सुरू असून सर्व विभागांमध्ये विकासकामे राबवली जात आहेत. पुनीत राजकुमार हृदय ज्योती, टेली आयसीयू आणि गृह आरोग्य योजना प्रभावीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालय परिसराच्या बांधकामासाठी आवश्यक २ कोटी रुपयांचे अनुदान स्थानिक आमदारांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी सांगितले की, ५० खाटांच्या सीसीयू बांधकामासाठी सुमारे २३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रुग्णालयातील कर्मचारी चांगले काम करत असून सात वर्षांपूर्वी जिथे केवळ ११० ओपीडी नोंदणी होत होती, तिथे आता ८०० हून अधिक रुग्णांची नोंदणी होत आहे. कंत्राटदाराला निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, केएसआरटीसीचे राज्य उपाध्यक्ष सुनील हनुमण्णावर, जिल्हा हमी योजना अंमलबजावणी समितीचे जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी ईश्वर गडादी, बैलहोंगल तहसीलदार हनुमंत शिरहट्टी, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय सिद्धाण्णा तसेच आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

The post बैलहोंगलमध्ये ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या इमारतीची पायाभरणी appeared first on News 24 Tass Marathi.

मलप्रभा नदीत चोरीसाठी वापरलेल्या तीन दुचाकी सापडल्या !
बैलहोंगल / वार्ताहर

बैलहोंगल तालुक्यातील नयानगरजवळ मलप्रभा नदीपात्रात तीन दुचाकी संशयास्पदरीत्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरी आणि दरोड्यासारख्या गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या या गाड्या पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नदीपात्रात दुचाकी दिसत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ बैलहोंगल पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही गाड्या पाण्याबाहेर काढल्या. प्राथमिक चौकशीत या दुचाकी चोरीच्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चोरट्यांनी गाड्यांचा गैरवापर केल्यानंतर पकड टाळण्यासाठी त्या नदीत फेकल्याचा अंदाज आहे.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी दोन दुचाकींवर KA-25-G-1459 आणि KA-24-J-7907 असे क्रमांक आढळले, तर तिसऱ्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. यावरून संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे.

पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, होंडा शाईन, अपाची आणि स्प्लेंडर प्लस या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्या सवदत्ती येथे झालेल्या सराफी पेढीवरील दरोड्यात वापरण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुन्ह्यानंतर आरोपींनी ओळख पटू नये म्हणून या गाड्या नदीत फेकून दिल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे.

या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून दुचाकींचे मूळ मालक आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

The post मलप्रभा नदीत चोरीसाठी वापरलेल्या तीन दुचाकी सापडल्या ! appeared first on News 24 Tass Marathi.

मायक्रोफायनान्सच्या छळामुळे डेथनोट लिहून महिलेची आत्महत्या
बैलहोंगल तालुक्यातील घटना

बैलहोंगल / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ गावात मायक्रोफायनान्स कर्जाच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.आत्महत्ये पूर्वी तिने घराच्या भिंतीवर डेथनोट लिहल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भिंतीवर लिहिलेल्या या डेथनोटमुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. डेथनोटमध्ये तिने काही व्यक्तींना आपल्या मृत्यूस जबाबदार धरल्याचे समजते.

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव गौरव्वा निलप्पा केंगानूर (वय ३६) असे आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विविध मायक्रोफायनान्स संस्थांकडून सुमारे ७ ते १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जफेडीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडून सातत्याने दबाव व त्रास होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हा मानसिक ताण सहन न झाल्याने गौरवने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

मृत्युपत्रात तिने सुमव्वा, मंजप्पा आणि कस्तुरी यांची नावे घेत आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्या मुलांच्या शिक्षण व भवितव्याबाबत शेवटची इच्छा व्यक्त केली आहे.

या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. घटनेनंतर मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

The post मायक्रोफायनान्सच्या छळामुळे डेथनोट लिहून महिलेची आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

देशनूरमध्ये वाल्मिकी भवन निर्मितीवरून हिंसक संघर्ष
दोन गटांत तुफान हाणामारी : गावात तणावाचे वातावरण

बैलहोंगल / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील देशनूर गावात वाल्मिकी भवन निर्मितीच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये तीव्र संघर्ष होऊन परिस्थिती चिघळली. या वादाचे रूपांतर थेट हाणामारी आणि जमावाच्या हल्ल्यात झाले असून, एका कुटुंबावर दगडफेक व तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाल्मिकी पुतळा व भवनासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षण कामाला सदाशिव भजंत्री यांच्या कुटुंबाने विरोध केल्याने शेकडो लोक संतप्त झाले. संक्रांतीच्या सणानिमित्त घरात स्वयंपाक सुरू असतानाच जमावाने त्यांच्या घरावर अचानक दगडफेक केली. या हल्ल्यात घराचे छप्पर, शौचालय तसेच घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. हातात दगड व लाठ्या घेऊन महिलांसह अनेकजण हल्ल्यात सहभागी असल्याची दृश्ये मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

हल्ल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी दरवाजे बंद करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने दरवाजे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात एका वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली असून जखमींना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणात वाल्मिकी समाजावर २००८ पासून अन्याय होत असल्याचा आरोप करत, संबंधितांनी बेकायदेशीर अतिक्रमण आणि पूर्वी दिलेल्या घरांच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घटनेचे व्हिडिओ तपासून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. नेसरगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या देशनूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

The post देशनूरमध्ये वाल्मिकी भवन निर्मितीवरून हिंसक संघर्ष appeared first on News 24 Tass Marathi.

वृद्ध वडिलांवर मुलाचा चाकूहल्ला
बैलहोंगल / वार्ताहर

शहाणपण शिकवणाऱ्या वृद्ध वडिलांवरच मुलाने चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यात घडली. मुलांना खेळू देण्याच्या मुद्दयावरून वडील आणि मुलामध्ये भांडण झाले आणि यादरम्यान मुलाने वडिलांवर चाकूने चाकूने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बसैया एनगीमठ (६२) यांना तातडीने बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगा विजय एनगीमठ याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. बसैया एनगीमठ यांची दोन्ही मुले शेजारी राहतात आणि मुलांना खेळू देण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्याच्या वडिलांनी बसैय्या यांना त्यांच्या मुलाच्या वागण्याबद्दल फटकारले तेव्हा संतापलेल्या विजयने त्यांच्या वडिलांवर चाकूने वार करून त्यांना जखमी केल्याचे कळते.

The post वृद्ध वडिलांवर मुलाचा चाकूहल्ला appeared first on News 24 Tass Marathi.

बैलहोंगल येथील इनामदार साखर कारखान्यातील बॉयलर स्फोटात सात जणांचा मृत्यू
बैलहोंगल / वार्ताहर

बैलहोंगल तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या इनामदार साखर कारखान्यात झालेल्या भीषण बॉयलर स्फोटातील मृतांचा आकडा सातवर गेला आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी चार कामगारांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेची तीव्रता अधिकच वाढली आहे.

ही घटना बुधवारी घडली. साखर कारखान्यातील कंपार्टमेंट क्रमांक १ येथे भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटामुळे बॉयलरमधील उकळलेला काकवीचा रस कामगारांच्या अंगावर उडाल्याने आठ कामगार गंभीररीत्या भाजले.

अपघातानंतर जखमी कामगारांना तातडीने बेळगाव येथील केएलई रुग्णालय तसेच बैलहोंगल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी मंगळवारी दीपक मुनवल्ली (वय ३१, रा. नेसरगी, ता. बैलहोंगल), सुदर्शन बनोशी (वय २५, रा. चिक्कमुनवल्ली, ता. खानापूर) आणि अक्षय सुभाष चोपडे (वय ४८, रा. राबकवी-बनहट्टी, जि. बागलकोट) या तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

दरम्यान, गुरुवारी उपचार सुरू असतानाच आणखी चार कामगारांनी प्राण सोडले. त्यामध्ये भरत बसप्पा सरवाडी (वय २७, रा. गोडचिनामलकी, ता. गोकाक), मंजुनाथ मडीवळप्पा काजगर (वय २८, रा. अरवल्ली, ता. बैलहोंगल), गुरुनाथ भीरप्पा तम्मणावर (वय ३८, रा. मारेगुडी, जि. बागलकोट) आणि मंजुनाथ गोपाल तेरादळ (वय ३१, रा. हुलिकट्टी, ता. अथणी) यांचा समावेश आहे. तर राघवेंद्र मल्लप्पा गिरियाळ (वय ३६, रा. गिलीहोसूर, ता. गोकाक) यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

केएलई रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर मृतांच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. हा साखर कारखाना विक्रम इनामदार, डॉ. प्रभाकर कोरे आणि विजय मेटगुड यांच्या मालकीचा असून, कारखाना व्यवस्थापनाची निष्काळजीपणा व अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळेच हा अपघात झाल्याचे आरोप पुढे येत आहेत.

या घटनेप्रकरणी मुरगोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे तसेच कामगार संघटनांकडून होत आहे.

The post बैलहोंगल येथील इनामदार साखर कारखान्यातील बॉयलर स्फोटात सात जणांचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.