fraud Archives | News 24 Tass Marathi

शिवानंद नीलण्णावर यांना १२ दिवसांची ईडी कोठडी
बेळगावातील शिवम असोसिएट्स फसवणूक प्रकरण

२,११० कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा तपास सुरू

बेंगळुरू : बेळगावातील शिवम असोसिएट्स फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवानंद नीलण्णावर यांना अटक केली आहे. मंगळूरू विभागातील ईडी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर मंगळूरू येथील विशेष ईडी न्यायालयाने नीलण्णावर यांना २४ ऑगस्टपर्यंत १२ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाच्या तपासात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिवानंद नीलण्णावर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडीने म्हटले आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा आणि छत्तीसगडमध्येही या प्रकरणाशी संबंधित गुंतवणूक झाल्याचे तपासात समोर आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

ईडीच्या माहितीनुसार, पॉन्झी पद्धतीच्या योजनेद्वारे तब्बल २,११०.९७ कोटी रुपये बेकायदेशीररीत्या जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. या रकमेतून गुंतवणूकदारांना केवळ काही भागच परत करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे ईडीने नमूद केले आहे.

कंपनीला २०१९ पासून शेअर बाजारातील व्यवहारात तोटा होत होता. हा तोटा लपवण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांकडून जमा केलेल्या पैशांचा वापर जुन्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात रक्कम देण्यासाठी करण्यात आल्याचा आरोपही ईडीने केला आहे.

तपासादरम्यान बेकायदेशीररीत्या जमा केलेल्या पैशांचा वापर आलिशान वाहने खरेदी करणे, बंगला बांधणे, भागीदारांच्या नावावर मालमत्ता घेणे तसेच चित्रपट निर्मितीसाठी करण्यात आल्याचे समोर आल्याचे ईडीने सांगितले आहे. हा निधी गुन्ह्यातून मिळालेली रक्कम असल्याचा तपास यंत्रणेचा दावा असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा पुढील तपास सुरू आहे.

The post शिवानंद नीलण्णावर यांना १२ दिवसांची ईडी कोठडी appeared first on News 24 Tass Marathi.

सीआयडी तपासानंतर शिवानंद निलण्णावर यांच्या घरावर ईडीचा छापा
जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींची रक्कम जमा केल्याचा आरोप

कागदपत्रांची तपासणी

बेळगाव : जादा व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप असलेल्या शिवम असोसिएट्स कंपनीविरोधातील तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिवानंद नीलण्णावर यांच्या शिवबसव नगर येथील निवासस्थानी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि महत्त्वाच्या नोंदींची तपासणी केली.

या प्रकरणात यापूर्वी बड्स कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या सीआयडीकडून तपास सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीनेही स्वतंत्रपणे कारवाई करत प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.

ईडीच्या पथकाने शिवानंद नीलण्णावर यांच्या निवासस्थानी तपासणी करताना त्यांच्या पत्नी संगीता आणि जावई संजू यांचीही चौकशी केली. मंगळुरू आणि गोवा येथील ईडी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, नीलण्णावर यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवरही ईडीने झडती घेतली. बेळगाव जिल्ह्यातील बडकुंद्री येथील घर तसेच चिक्कोडी येथील सुभाष यांच्या निवासस्थानीही तपास करण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणात १५ मे रोजी बेळगाव सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. सीआयडीचा तपास सुरू असतानाच ईडीच्या कारवाईमुळे शिवम असोसिएट्स प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

The post सीआयडी तपासानंतर शिवानंद निलण्णावर यांच्या घरावर ईडीचा छापा appeared first on News 24 Tass Marathi.

क्रीडा स्पर्धांतील वयोमर्यादा गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी
सांबरा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : शालेय तसेच विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या वयोमर्यादेशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पडताळणी यंत्रणा लागू करावी, या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील सांबरा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.

निवेदनात शालेय, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये काही खेळाडू बनावट जन्मदाखले आणि चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे वयोमर्यादेचे नियम मोडून सहभागी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र आणि गुणवंत खेळाडूंवर अन्याय होत असून, क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकता आणि निष्पक्ष स्पर्धेलाही धक्का बसत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर संशयास्पद प्रकरणांमध्ये वय पडताळणी चाचणी आणि कागदपत्रांची सक्तीची तपासणी बेळगाव जिल्ह्यातही लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व खेळाडूंचे जन्मदाखले, आधार कार्ड आणि शालेय नोंदींची सखोल पडताळणी करावी, वयाबाबत संशय असलेल्या खेळाडूंची वय पडताळणी चाचणी अनिवार्य करावी, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि स्पर्धा आयोजकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने द्याव्यात, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. या उपाययोजनांमुळे क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकता वाढून पात्र आणि गुणवंत खेळाडूंना न्याय मिळेल तसेच स्पर्धांची विश्वासार्हता अधिक बळकट होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला.

यावेळी वासुदेव पाटील, कुमार हुब्बळीकर, सोमनाथ घंटेकर, सुधीर मलायी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

The post क्रीडा स्पर्धांतील वयोमर्यादा गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजपचे तीव्र आंदोलन
काँग्रेस भवनला घेरावाचा प्रयत्न ; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

बेळगाव : नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधासाठी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा तसेच भाजप आमदारांवर अंडी फेकल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने बेळगावात तीव्र आंदोलन केले. राणी चन्नम्मा चौकातून काँग्रेस भवनकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

राणी चन्नम्मा चौकातून निघालेल्या मोर्चात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. काँग्रेस भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा देणे आणि देशविरोधी वक्तव्ये करणे अस्वीकार्य असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याला भाजपचा विरोध नसून, आंदोलनाच्या नावाखाली देशद्रोही कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.

बंगळुरूमध्ये आंदोलनादरम्यान भाजप आमदारांवर अंडी फेकल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माजी विधान परिषद सदस्य महंतेश कवटगीमठ आणि भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आंदोलनादरम्यान देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींची व्हिडिओ फुटेजच्या आधारे ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

मोर्चादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखले. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The post नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजपचे तीव्र आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi.

नीट गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बेळगावात युथ काँग्रेस व विद्यार्थ्यांची तीव्र निदर्शने
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बेळगाव : देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा प्रश्नपत्रिका गळती आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी युथ काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी बेळगावात तीव्र आंदोलन छेडले. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा तसेच योग्य आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलकांनी आरोप केला की, गेल्या दहा वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका १५० हून अधिक वेळा फुटल्या असून, अलीकडील काळातही ७० पेक्षा अधिक गैरप्रकार समोर आले आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

मुसळधार पावसातही विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे त्याग करत असताना परीक्षांतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. तसेच शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाचाही त्यांनी निषेध नोंदवला.

युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये केवळ २२ कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असून उर्वरित कर्मचारी कंत्राटी आहेत. त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

The post नीट गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बेळगावात युथ काँग्रेस व विद्यार्थ्यांची तीव्र निदर्शने appeared first on News 24 Tass Marathi.

आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराने जिल्ह्यात खळबळ
भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील तब्बल ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी झुंजारराव खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित विश्वस्त, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत देवस्थान समितीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संगनमत करून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात, फसवणूक तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तपासात संबंधितांनी संगनमताने आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी तत्कालीन कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच इतर संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांना आरोपी करण्यात आले आहे.

आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे तसेच गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहाराची एकूण रक्कम ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

The post आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराने जिल्ह्यात खळबळ appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावमध्ये आणखी दोन गुंतवणूक कंपन्यांवर धाड
जास्त परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची गुंतवणूक

जिल्हा प्रशासनाची कारवाई तीव्र

बेळगाव : जास्त व्याजदराचे आमिष दाखवून जनतेकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक उभारल्याच्या आरोपांप्रकरणी बेळगाव जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी आणखी दोन खासगी गुंतवणूक कंपन्यांवर धाड टाकली. शिवम असोसिएट्स आणि आदित्यराज कॅपिटलवरील अलीकडील कारवाईनंतर अनधिकृत गुंतवणूक कंपन्यांविरोधातील मोहिमेला अधिक वेग आला आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी श्रवण कुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने टिळकवाडी येथील ग्रोधन एलएलपी आणि महात्मा फुले रोडवरील सिटी इंडेक्स या कंपन्यांच्या कार्यालयांवर एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान आर्थिक व्यवहार, कागदपत्रे, गुंतवणूकदारांची माहिती आणि इतर दस्तऐवजांची सखोल तपासणी करण्यात आली.

प्राथमिक चौकशीत या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दरमहा चार ते पाच टक्के परताव्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर निधी उभारल्याचे समोर आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कारवाईदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उपविभागीय अधिकारी श्रवण कुमार नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रोधन एलएलपीमध्ये सुमारे १,१०० गुंतवणूकदारांनी ३८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून ही रक्कम कर्जाच्या स्वरूपात वापरण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

तर सिटी इंडेक्समध्ये सुमारे १,५०० गुंतवणूकदारांनी जवळपास ३० कोटी रुपये गुंतवल्याचे तपासात समोर आले आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार ही रक्कम डिबेंचर्सच्या माध्यमातून उभारण्यात आली असून कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कंपनीच्या कायदेशीर स्थितीबरोबरच आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी सुरू आहे.

ग्रोधन एलएलपीवरील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून सिटी इंडेक्सवरील तपास शनिवारीही सुरू राहणार आहे. संपूर्ण चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती श्रवण कुमार नायक यांनी दिली.

सार्वजनिक पैशांच्या कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संबंधित प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या संशयित गुंतवणूक कंपन्यांवर जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

The post बेळगावमध्ये आणखी दोन गुंतवणूक कंपन्यांवर धाड appeared first on News 24 Tass Marathi.

‘शिवम असोसिएट्स’ प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावरला जामीन मंजूर
बेळगाव : राज्यभरात चर्चेत असलेल्या ‘शिवम असोसिएट्स’ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला असून, त्याची हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या विविध अटींचे पालन करण्याच्या अधीन राहून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी १५ मे रोजी शिवानंद नीलण्णावर याला आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. या प्रकरणाची सुनावणी बेंगळुरू येथील सिटी सिव्हिल आणि सत्र न्यायालयात झाली.

न्यायालयाने १२ जून रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करत काही कठोर अटी घातल्या आहेत. त्यानुसार, नीलण्णावर याने तीन लाख रुपयांचे हमीपत्र सादर करणे, देशाबाहेर न जाणे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच २७ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

जामीन मंजूर झाल्यानंतर शिवानंद नीलण्णावरची काल रात्री हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहाबाहेर उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी कोणतीही सविस्तर माहिती न देता केवळ “ओम नमः शिवाय” असा उल्लेख करून तेथून प्रस्थान केले.

दरम्यान, या प्रकरणातील तपास सुरू असून आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांचे दावे आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

The post ‘शिवम असोसिएट्स’ प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावरला जामीन मंजूर appeared first on News 24 Tass Marathi.

शिवम असोसिएट्सच्या मालकाला सीआयडीकडून अटक
४,५०० कोटींच्या घोटाळ्याचे खळबळजनक रहस्य उघड

डीआयजीपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

बेळगाव : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या ४,५०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात सीआयडी पोलिसांनी बेळगावमधील ‘शिवम असोसिएट्स’चे मालक शिवानंद नीलन्नवर यांना अटक केली आहे. तपासादरम्यान, हा घोटाळा झाल्याचे पुराव्यांसह सिद्ध झाले. बेळगावमध्ये एक महत्त्वाची संयुक्त पत्रकार परिषद घेतलेल्या सीआयडीचे डीआयजीपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या प्रकरणातील खळबळजनक माहिती माध्यमांसमोर उघड केली.

जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे शिवम असोसिएट्सवर छापा टाकून एफआयआर दाखल केल्यानंतरही, जनतेने शिवम असोसिएट्समध्ये आणखी ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे, जनतेला माहिती देण्यासाठी सीआयडीने ही पत्रकार परिषद घेतली आहे, जेणेकरून ते सतर्क राहतील आणि अशा फसवणुकीला बळी पडणार नाहीत.

जुन्या गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांवर व्याज : सीआयडीने ‘पोंजी योजने’चे गुपित उघड केले

सीआयडी डीआयजीपीच्या म्हणण्यानुसार, शिवानंद नीलण्णवर यांनी आतापर्यंत सुमारे ४०,७०० गुंतवणूकदारांकडून एकूण २,४०० कोटी रुपये जमा केले आहेत. त्यांनी यातील बहुतांश रक्कम जनतेला परत केली आहे. नवीन गुंतवणूकदारांचे पैसे जुन्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात वाटण्यात आले. मात्र, जेव्हा जुन्या गुंतवणूकदारांना द्यायच्या व्याजाची रक्कम नव्याने जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त झाली, तेव्हा संपूर्ण यंत्रणा कोलमडली आणि या फसवणुकीचे गुपित उघड झाले.

शेअर बाजारातील तोटा, वैयक्तिक वापर :

जमा केलेल्या रकमेपैकी ५४० कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले गेले, त्यापैकी १७० कोटी रुपयांचे नुकसान झाले. सध्याच्या तपासात ६६० कोटी रुपयांची तूट आढळून आली आहे, त्यापैकी ३३० कोटी रुपये वसूल होऊ शकतील असा अंदाज आहे. मालक नीलण्णवर यांनी कंपनीतून ५५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे त्यांच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित केले असून, या प्रकरणात आणखी एका भागीदाराचाही सहभाग आहे.

आलिशान गाड्यांची जप्ती आणि चित्रपट कलाकारांना नोटीसची भीती :

आरोपींकडून ५ आलिशान गाड्या आधीच जप्त करण्यात आल्या असून, कंपनीच्या पैशाने खरेदी केलेल्या उर्वरित ११ व्होल्वो एक्ससी९० (Volvo XC90) आलिशान गाड्या लवकरच जप्त केल्या जातील, असे सीआयडीने सांगितले. तपासादरम्यान एकूण ३० बँक खाती आढळून आली, त्यापैकी ७ खात्यांचा वापर मोठ्या रकमेच्या हस्तांतरणासाठी केला जात होता. केवळ एका बँक खात्यात ३६,२०० पानांची दीर्घकालीन व्यवहारांची नोंद सापडली असून, सीआयडी याचा तपास करत आहे. या कंपनीतून चित्रपट कलाकारांना पैसे दिले गेल्याचा संशय असून, पुरावे सापडल्यास चित्रपट कलाकारांनाही नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले जाईल, असा इशारा डीआयजीपींनी दिला आहे.

महाराष्ट्र संबंध आणि पैसे कसे परत करायचे? :

फसवणुकीचे हे जाळे शेजारच्या महाराष्ट्र राज्यातही पसरले असून, त्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने तपास तीव्र करण्यात आला आहे. कंपनी पूर्णपणे बुडण्यापूर्वी छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पूर्वी गुंतवणूकदारांना बेकायदेशीरपणे देण्यात आलेले ४०० कोटी रुपये वसूल करण्याचा निर्णय सीआयडीने घेतला आहे. ही अतिरिक्त रक्कम उर्वरित गुंतवणूकदारांना वितरित केली जाईल.

वसूल करण्यात येणारी रक्कम ‘बड्स’ कायद्याचे प्रमुख आदित्य अमलान बिस्वास यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर ते कायदेशीर प्रक्रियेद्वारे ही रक्कम जनतेला परत करतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

The post शिवम असोसिएट्सच्या मालकाला सीआयडीकडून अटक appeared first on News 24 Tass Marathi.

आदित्यराज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांना अडवण्याचा प्रयत्न
वृत्तांकनास विरोध केल्याचा आरोप ; पत्रकारांची पोलिसांत तक्रार

चार महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध बहुकोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर भाग्यनगर येथील कंपनीच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी चार महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीविरोधातील कारवाई आणि कार्यालयातील घडामोडींची माहिती घेण्यासाठी विविध माध्यमांचे प्रतिनिधी कार्यालय परिसरात दाखल झाले होते. यावेळी काही महिला कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्यास तसेच चित्रीकरण करण्यास विरोध केल्याचे सांगितले जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत माध्यम प्रतिनिधींशी वाद घातल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही कर्मचारी एकत्र येत पत्रकारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच अपमानास्पद शब्दांचा वापर करून पत्रकारांना तेथून निघून जाण्यास सांगण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे काही काळ कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

याचदरम्यान काही पुरुष कर्मचाऱ्यांनीही माध्यम प्रतिनिधींशी शाब्दिक चकमक केल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे मालक बालराज माने यांच्या समर्थनार्थ काही कर्मचारी उघडपणे भूमिका घेत असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले. माहिती बाहेर जाऊ नये यासाठी पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माध्यम प्रतिनिधींनी केला आहे.

दरम्यान, आदित्यराज कॅपिटलविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे आधीच शहरात खळबळ उडाली असून, संबंधित यंत्रणांकडून तपास आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांशी झालेल्या कथित गैरवर्तनामुळे पत्रकार संघटनांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. माहिती संकलन आणि वृत्तांकन करणे हा पत्रकारांचा घटनादत्त अधिकार असून, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची अरेरावी किंवा धक्काबुक्की होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर पत्रकारांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी पत्रकारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आदित्यराज कॅपिटलच्या चार महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनांकडून करण्यात आली आहे.

The post आदित्यराज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांना अडवण्याचा प्रयत्न appeared first on News 24 Tass Marathi.