devotional Archives | News 24 Tass Marathi

कणबर्गीच्या श्री सिद्धेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारी भाविकांची रीघ
धार्मिक कार्यक्रमांसह पारंपरिक मिरवणूक उत्साहात

हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा घेतला लाभ

बेळगाव : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

शेवटच्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून गावातून भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीत तरुण-तरुणींनी सादर केलेली विविध साहसी प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली. तसेच आकर्षक पद्धतीने सजवलेल्या बैलगाड्यांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :

श्री सिद्धेश्वर भक्त मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त कणबर्गी परिसरात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

The post कणबर्गीच्या श्री सिद्धेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारी भाविकांची रीघ appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक मंगळवारी
बेळगाव : येळ्ळूर येथील ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा श्रावण मासानिमित सालाबादप्रमाणे मंगळावर दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित सकाळी ८ वाजता कलस मिरवणूक श्री चांगळेश्वरी मंदिरपासून निघणार असून मिरवणूक मध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी सकाळी ७.३० वाजता मंदिरमध्ये उपस्थित रहावे. मिरवणुकीनंतर सकाळी ९ वाजता अभिषेक होणार आहे. तरी भाविकांनी अभिषेक व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री चांगळेश्वरी अभिषेक मंडळ व श्री चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

The post येळ्ळूर श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक मंगळवारी appeared first on News 24 Tass Marathi.

मुतगा येथील श्री भावेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेला उत्साहात प्रारंभ
शेकडो वर्षांची परंपरा जपत देवीला सुके खोबरे अर्पण

कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यातून भाविकांची गर्दी

बेळगाव : तालुक्यातील मुतगा गावात ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या श्री भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या यात्रेत कर्नाटकासह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.

श्री भावेश्वरी देवीला श्रीफळाऐवजी सुके खोबरे अर्पण करण्याची शेकडो वर्षांची परंपरा या यात्रेचे विशेष आकर्षण आहे. भाविकांकडून आजही ही परंपरा श्रद्धेने जपली जात असून, यात्रेदरम्यान मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

मुतगा आणि खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक संबंधांमुळे या परिसरातील नागरिकांची यात्रेला मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध समित्यांकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

भाविकांनी आपली वाहने निर्धारित ठिकाणीच उभी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन बाहू पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, यात्रेतील पारंपरिक प्रथा कायम ठेवत भाविकांनी देवीला केवळ सुके खोबरेच अर्पण करावे, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले आहे.

The post मुतगा येथील श्री भावेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेला उत्साहात प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

रामदुर्ग येथील राघवेंद्र स्वामी मठाच्या दानपेटीत सापडले अनोखे पत्र
“स्वामी, मला एका मुलीपासून वाचवा” अशी अज्ञात भक्ताची प्रार्थना

रामदुर्गातील घटनेची सोशल मीडियावर चर्चा

रामदुर्ग : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील पदकोट गल्ली येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या दानपेटीची मोजणी करताना एक अनोखे आणि भावनिक पत्र सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका अज्ञात भक्ताने पत्रातून “स्वामी, मला एका मुलीपासून वाचवा,” अशी आगळीवेगळी प्रार्थना केली असून या पत्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

सामान्यतः नोकरी, विवाह, आरोग्य, शिक्षण किंवा कौटुंबिक सुखासाठी भक्त देवस्थानातील दानपेटीत आपल्या मनातील भावना व्यक्त करणारी पत्रे टाकतात. मात्र, पाडकोटगल्ली येथील मठात दानपेटीची मोजणी सुरू असताना कर्मचाऱ्यांच्या हाती आलेले हे पत्र सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे ठरले.

पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने आपले नाव आणि पत्ता नमूद केलेला नसून, “स्वामी, मला एका मुलीपासून वाचवा,” एवढीच भावनिक विनंती केली आहे. या अनोख्या पत्रामुळे मठातील कर्मचारी आणि उपस्थित भक्तांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, या पत्राचा फोटो आणि त्यातील मजकूर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकजण त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींनी याकडे विनोदी दृष्टीने पाहिले असले, तरी काहींनी ही एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अडचणीची भावनिक अभिव्यक्ती असू शकते, असे मत व्यक्त केले आहे.

The post रामदुर्ग येथील राघवेंद्र स्वामी मठाच्या दानपेटीत सापडले अनोखे पत्र appeared first on News 24 Tass Marathi.

आषाढी एकादशीनिमित्त वीर सौध योगा केंद्रात किर्तनाचा जागर
बेळगाव : टिळकवाडी येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने ह. भ. प सौ.अश्विनी सरनोबत यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते संत कान्होपात्रा यांच्या अभंगातून भक्तीचा जागर त्यांनी रसाळ, ओघवत्या शैलीतून मांडणी करून संतांचे विचार मानसिक समाधान देतात.आध्यात्मिक हाच खरा मानवी धर्म आहे जीवन कृतार्थ होण्यासाठी नामाचा जयघोष करा.संत तुकाराम, एकनाथ महाराज, नामदेवांनी भक्तीचा मार्ग अठरा पगड जातीला दाखवून जगण्याचा अधिकार दिला लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल,जय जय राम कृष्ण हरी हा जयघोष करीत पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन वारकरी संप्रदायाची‌ पताका खांद्यावर घेतात.हा एकतेचा संदेश संतांनी दिला.असे विविध दृष्टांत देऊन संतमहती कथन केली.

प्रारंभी विठ्ठल प्रतिमेचे पूजन योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले. उषा दळवी व विजयालक्ष्मी मायकलवार यांनी सौ. अश्विनी रवि सरनोबत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

प्रास्ताविक व परिचय वाय. पी. नाईक यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय कुरविनकोप यांनी केले. आभार प्रा. भूदेवी पुरोहित यांनी मानले. यावेळी उमेश सुपाले रवींद्र सुतार गीता देशपांडे, शोभा दुर्वे, पल्लवी मदली,वर्षा शानबाग, बीना मुन्नोळकर, स्मिता निंबाळकर, सुलक्षणा जाधव, नारायण नवखणकर, शामल पाटील  आदि सदस्य उपस्थित होते.

The post आषाढी एकादशीनिमित्त वीर सौध योगा केंद्रात किर्तनाचा जागर appeared first on News 24 Tass Marathi.

वरुणराजाच्या कृपेसाठी श्री कपिलेश्वरांना साकडे
सकल मराठा समाज बेळगाव वतीने सोमवारी’महाआरती’ आयोजन

सकल मराठा समाज बेळगावचे जाहीर आवाहन

१८ पगड आणि १२ बलुतेदार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव : बेळगावचा बहुसंख्य असलेला मराठा समाज हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून शेतीवरच या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यंदाच्या हंगामात वरुणराजाने आणि निसर्गाने बळीराजाला उत्तम साथ द्यावी, पिकांची चांगली भरभराट व्हावी, आणि पर्यायाने शेतकरी व बहुजन समाजाचे कल्याण व्हावे, या उदात्त हेतूने सोमवार, दिनांक २९ जून रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिण काशी म्हणून अत्यंत पवित्र मानले जाणारे बेळगावचे श्री क्षेत्र कपिलेश्वर तीर्थ मंदिर येथे सायंकाळी ठीक ७:०० वाजता समस्त मराठा समाजाच्या वतीने देवा चरणी ‘गाराणे’ घालून ‘महाआरती’ करण्यात येणार आहे.

प्रमुख आयोजक आणि नेतृत्व  सकल मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या वतीने या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने  किरण जाधव (नेते, सकल मराठा समाज) , रमाकांत कोंडुसकर (नेते, सकल मराठा समाज) , रणजित चव्हाण पाटील (ज्येष्ठ नेते, मराठा समाज) , सागर पाटील (समन्वयक, मराठा समाज), कपिल भोसले (समन्वयक, मराठा समाज), प्रकाश बेळगोजी (समन्वयक, मराठा समाज) यांच्यासह मराठा समाजातील इतर अनेक प्रमुख नेत्यांचा पुढाकार आहे. सर्व समाजबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन “आपल्या बळीराजाला समाधानकारक पाऊस मिळावा, हवामान अनुकूल राहावे, शेती पिकांची उत्तम भरभराट होऊन सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी यावी, हीच या गाराण्यामागची मुख्य भावना आहे. यासाठी केवळ मराठा समाजच नव्हे, तर १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार सर्वच जाती-जमातींच्या प्रमुखांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”

वार आणि दिनांक: सोमवार, २९ जून

वेळ: सायंकाळी ठीक ७:०० वाजता

ठिकाण: श्री कपिलेश्वर तीर्थ मंदिर (दक्षिण काशी), बेळगाव.

निमंत्रक: सकल मराठा समाज, बेळगाव.

The post वरुणराजाच्या कृपेसाठी श्री कपिलेश्वरांना साकडे appeared first on News 24 Tass Marathi.

अधिक मासात सौंदत्ती रेणुका देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सौंदत्ती : अधिक मासात सौंदत्ती डोंगरावर उद गं…आई उदं चार गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भाविकांनी सौंदत्ती श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

गेल्या आठ सप्ताह भरात तब्बल १ लाखांहून अधिक भाविकांनी रेणुका देवीचे दर्शन घेतले. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यल्लमा डोंगर गर्दीने फुलून गेलेला पाहायला मिळत आहे.मंगळवार आणि शुक्रवारी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. डोंगरावर देवी दर्शनाला येण्यापूर्वी जोगनभावी कुंडावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

The post अधिक मासात सौंदत्ती रेणुका देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी appeared first on News 24 Tass Marathi.

समाजाच्या अगतिकेला आपण क्रौर्य ठरवणार काय ?
– डॉ. शेवडे यांचा सवाल

बेळगाव : वनवासाला जाण्याची आज्ञा फक्त श्रीरामांना झाली होती, सीतेला नव्हे ! त्यामुळे वसिष्ठांनी तिला राज्यावर बसण्याबद्दल सुचवले. ते म्हणाले की, तुझा राज्यशास्त्राचा अभ्यास मला माहिती आहे आणि त्यामुळे राम परत येईपर्यंत हे राज्य तू चालवावेस. याचा अर्थ त्याकाळच्या स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत होत्या, हे लक्षात येते. इतकेच नव्हे तर, अयोध्येमध्ये स्त्रियांसाठी वेगळी क्रीडाभवने असल्याचा स्पष्ट उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये मिळतो. असे असताना स्त्रियांना घरी ठेवण्याची पद्धत कधी चालू झाली याचा विचार करायला नको का? ज्यावेळी बाहेरील आक्रमक या देशावर चालून आले, त्यावेळी ते कोणत्याही वयाच्या स्त्रीला उचलून पळवून नेत होते आणि आपल्या जनानखान्यात भरती करत असत. तसे होऊ नये म्हणून कदाचित त्यावेळच्या समाजाने अशा भयंकरापेक्षा स्त्रीने घरातच राहावे असा विचार केला असेल तर तो विचार म्हणजे त्या वेळच्या समाजाची अगतिकता नव्हे नव्हती का? मग अशा अगतिकतेला आज आपण क्रौर्य हे नाव देणार का? असा मर्मभेदी सवाल आंतरराष्ट्रीय वक्ते, अभ्यासक व प्रवचनकार डॉ. शेवडे यांनी विचारला. केळकरबागेतील श्रीराम मंदिरात चाललेली रामकथेतील चवथे पुष्प त्यांनी गुंफले.

राम-सीता-लक्ष्मण यांच्या वनवास काळात सीतेने एकदा रामांना विचारले की, राक्षस आपल्या वाटेला जात नसतील तर आपण त्यांची हत्या करणे हे योग्य ठरेल का? तुम्ही एकदम तशी प्रतिज्ञा का घेतली? याचाच अर्थ असा की, एक स्त्री आपल्या पतीला सहजपणे असे प्रश्न विचारू शकत होती. त्यावर रामांनी तिला गप्प बसवले नाही, तर तिच्या प्रश्नांना विस्तृत उत्तर दिले. वनवास काळात रामांनी केलेले राक्षस वध, आलेली संकटे आणि विविध ऋषींच्या भेटी हे सर्व प्रसंग मांडताना डॉ. शेवडे यांनी इतिहास आणि सामाजिक गोष्टी यांचेही संदर्भ सांगितले.

The post समाजाच्या अगतिकेला आपण क्रौर्य ठरवणार काय ? appeared first on News 24 Tass Marathi.

पंचकन्यांमध्ये अहल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता ; डॉ. शेवडे
बेळगाव : गौतमांच्या वेषात देवराज इंद्र आला आहे हे जाणूनही अहल्या इंद्राच्या आधीन झाली. बऱ्याच जणांना अहल्याच्या हातून हे पाप अजाणतेपणी झाले असे वाटते, परंतु वाल्मिकी रामायणात मात्र अहल्येने जाणीवपूर्वक हे पाप केल्याचे दिसते. गौतमांच्या येण्याची वेळ झाली हे पाहून तिने इंद्राला तातडीने निघून जाण्याचे सांगितले. गौतमांनी इंद्राला पाहिले आणि त्याला शाप दिला. त्याचप्रमाणे अहल्येलाही तू शिलावत जड होऊन पडशील असा शाप दिला. त्याचबरोबर नित्य भगवंताचे स्मरण करत इथे राहशील आणि त्या काळात कोणीही हिंस्र श्वापद अथवा पक्षी येथे येऊन तुला त्रास देणार नाहीत. इतकेच नव्हे तर तुला तहानभूकही लागणार नाही असे सांगून आपल्या पत्नीची काळजीही घेतल्याचे दिसते. पुढे श्रीराम तिथे आल्यावर तुझी शापातून मुक्तता होईल आणि त्याच वेळेला तुला घ्यायला मी स्वतः येईन असे आश्वासन त्यांनी दिले. विश्वामित्रांसह राम-लक्ष्मण तिथे आल्यावर त्यांनी अहल्येला वाकून नमस्कार केला. पाय लावला नाही. त्याचवेळी गौतम स्वतः तिला नेण्यासाठी आले. अहल्या ही स्वतः ऋषीपत्नी होती तपस्वीनी होती असे असूनही तिच्या आयुष्यात मोहाचा एक क्षण आला त्याबाबत शिक्षा भोगल्यानंतर मात्र तिची पापनिवृत्ती झाली. भारतीय संस्कृतीची महानता यातच आहे की, त्या तपस्वीनीचा भारतीय पंचकन्यांमध्ये समावेश केला आहे. एकदा झालेली चूक, ही शिक्षा भोगून झाल्यानंतर वारंवार सांगितली जाऊ नये, ही शिकवण यातून मिळते असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी रामायणावरील तिसरे पुष्प गुंफताना केले.

केळकर बागेत चाललेल्या श्रीराम कथेमध्ये, त्यांनी राम-सीता विवाह सांगून ते स्वयंवर नसल्याचे स्पष्ट केले. स्वयंवर या शब्दाचा अर्थ विस्तृतपणे त्यांनी सांगितला. त्यानंतर अयोध्या येथे आल्यानंतर राम लक्ष्मण हे पुढे बारा वर्षे अयोध्येत होते तर भरत-शत्रुघ्न हे भरताच्या मामासोबत आजोळी गेले. श्रीरामांच्या राज्याभिषेक विचार प्रसंगीही दशरथाने चारी वर्णांच्या प्रमुखांना बोलावून याबाबत त्यांचे मत जाणून घेतले ही महत्वपूर्ण बाब रामायणात नोंदली असल्याचे डॉ.शेवडे यांनी स्पष्ट केले. रामायणातील माहिती नसलेले कंगोरे दाखवून देणारी ही श्रीरामकथा उत्तरोत्तर रंगत चालली आहे.

The post पंचकन्यांमध्ये अहल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता ; डॉ. शेवडे appeared first on News 24 Tass Marathi.

श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय – डॉ.शेवडे
बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस यांच्या हातून वध न होण्याचा वर मिळवला होता. अति आत्मविश्वासाने त्याने यातून मनुष्याला वगळले होते. भगवंतांनी मनुष्यावतार घेऊन त्याचा नाश केला. रामजन्म म्हणजे अमंगलावर मांगल्याने, अभद्रावर भद्राने आणि काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होता असे प्रतिपादन ख्यातनाम प्रवचनकार आणि लेखक असलेल्या डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. केळकर बागेतील श्रीराममंदिरात आज दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

दशरथाने केलेल्या अश्वमेध व पुत्रकामेष्टी यज्ञात सर्व वर्णांच्या लोकांना बोलावून मानसन्मान करा अशी वसिष्ठांची स्पष्ट आज्ञा रामायणात नमूद केली आहे. याचाच अर्थ यज्ञादिक धार्मिक समारोहात चारी वर्णांचे लोक निमंत्रित असत हे सहज लक्षात येते. दशरथाच्या राज्याचे एकूण वर्णन पाहता तत्कालीन समाज हा संस्कारसंपन्न, धर्मनिष्ठ, वैभवसंपन्न, सुखी, कर्तव्यपरायण आणि शीलसंपन्न असा असल्याचे दिसून येते, असे डॉ.शेवडे यांनी नमूद केले. पुढे रामजन्म, बालपण, विश्वामित्रांसमवेत त्यांचे जाणे या सर्व गोष्टीतील बारकावे आणि सहसा ठाऊक नसलेला कथाभाग त्यांनी आपल्या प्रभावी वाणीने विशद केला.

The post श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय – डॉ.शेवडे appeared first on News 24 Tass Marathi.